IND vs AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी कसोटी पाचव्या दिवशी ड्रॉ झाली आहे. त्यामुळे भारताने कसोटी मालिकेमध्ये 2-1 अशी सरशी घेतली आहे. 1948 नंतर पहिल्यांदा भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामधे मालिका विजय नोंदवण्याची संधी मिळाली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली हा आपला पहिलाच मोठा ऐतिहासिक विजय आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वासाठी ही मोठी अभिमानास्प्द गोष्ट घडली आहे.
#INDvsAUS Fourth Test: Match draws after Sydney Test called off due to rain. India win series by 2-1 for the first time in Australia pic.twitter.com/MsTyb6sNgw
— ANI (@ANI) January 7, 2019
सिडनी कसोटीमध्ये 31 वर्षात पहिल्यांदाच आपण ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या मायदेशी फॉलोऑन दिला. चार मॅचेसमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी मिळवत मालिका जिंकली आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा या मालिकेचा सामनावीर ठरला आहे. India vs Australia 4th Test: KL Rahul च्या सिडनी मैदानावरील Sportsman Spirit चं अंपायर सह प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक
भारताने ऑस्ट्रेलियासमोर 622 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर रोखण्यात भारताला यश आल्यानंतर त्यांच्यावर फॉलो ऑनची (follow on) नामुष्की ओढावली. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची एकही विकेट गेली नव्हती. दुसऱ्या दिवस अखेर 24 धावा करत दिवस संपला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने ऑस्ट्रेलियाला दिवसाची सुरुवात करून दिली मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पटापट विकेट गेल्या. मात्र तिसरा दिवसही अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवून संपवण्यात आला. चौथ्या दिवशी भारताने 300 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखले. आज पाचव्या दिवशीदेखील पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारताकडून चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत या फलंदाजानी दमदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकलं.