India vs Australia 4th Test: KL Rahul च्या सिडनी मैदानावरील Sportsman Spirit चं अंपायर सह प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक
KL Rahul (Photo Credit: Getty Images)

India vs Australia 4th Test: भारताचा सलामीवीर के. एल राहुल  (KL Rahul ) सिडनी टेस्टमध्ये अवघ्या 9 धावांवर आउट झाल्याने त्याच्यावर सोशल मीडियात टीकेची झोड उठली होती. अनेक मिम्स व्हायरल झाले होते. पण आज ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना के एल राहुलने सामन्यात दाखवलेल्या प्रामाणिकपणा मुळेच ग्राउंडवर अंपायर इयान गोल्ड (Ian Gould) पासून अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामान्या दरम्यान तिसरा दिवसाचा खेळ आज सुरु झाला. पाचव्या ओव्हर वर मार्कस हैरिस खेळत असताना भारतीय स्पिनर रवींद्र जडेजा बॉलिंग करत असताना एक चूक झाली. ओवरच्या पहिल्याच बॉलवर हैरिस मिड ऑनवर मोठा शॉट खेळण्याची चूक करून बसला. KL Rahul च्या खराब कामगिरीवर सोशल मीडियात टीका, मीम्स व्हायरल

के. एल राहुलचा प्रामाणिकपणा

रवींद्र जडेजाचा बॉल आणि हॅरीसची बॅट यांचा ताळमेळ न बसल्याने बॉल हवेत गेला आणि मिड ऑन वर उभ्या असलेल्या राहुलजवळ आला. राहुलने हा बॉल घेतला. सगळ्यांना ही विकेट असल्यासारखं वाटलं पण स्वतःहून राहुलनेच हा बॉल बाऊन्स होऊन आल्याचं सांगितलं. हॅरिस आऊट नाही असे सांगितलं. मैदानावर राहुलच्या प्रामाणिकपणाचं अंपायरनेही कौतुक करत त्याला सलाम केला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला ६२२ धावांचे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रलियाची दमदार सुरुवात झाली असली तरीही आता संघाची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. भारत मजबूत स्थितीमध्ये असून विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.