IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) आज मालिकेच्या दुसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात आमने-सामने येणार आहेत. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जाणारा आजचा सामना टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि संघ हा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करू पाहत असेल, तर ऑस्ट्रेलियाचे लक्ष मालिका विजयाकडे असेल. यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेमध्ये भारताला 66 धावांनी पराभूत केले. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 650 हून अधिक धावा केल्या, त्यामुळे पुन्हा त्याच मैदानावर होणाऱ्या दुसर्या वनडे सामन्यातही मोठा स्कोर होईल असे दिसत आहे. सध्या भारतीय संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे आणि आजचा सामना गमावल्यास त्यांना मालिकाही गमवावी लागेल, त्यामुळे त्यांना कोणत्याही स्थितीत टीम इंडियाला (Team India) विजय गरजेचा आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणारा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:10 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 8:40 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. या शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाला त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही अधिक चांगले काम करावे लागेल,अन्यथा मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहील. मागील सामन्यात टीम इंडियाने फिल्डिंग विभागात निराशाजनक कामगिरी केली होती. शिवाय, टीम इंडिया गोलंदाजांसमोर डेविड वॉर्नर, आरोन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांना रोखण्याचे कठीण आव्हान असणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचे हे तीन फलंदाज टिकून खेळल्यास संघ मोठी धावसंख्या करेल हे नक्की.
पाहा ऑस्ट्रेलिया आणि भारत वनडे संघ
ऑस्ट्रेलिया वनडे टीम: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन , ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेजलवुड, अॅश्टन अगर, मोइसेस हेनरिक्स, मॅथ्यू वेड, सीन अॅबॉट, अँड्र्यू टाय, कॅमरून ग्रीन आणि डॅनियल सॅम्स.
भारतीय वनडे टीम: शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.