आयपीएल 2020 नंतर आणि कोरोना व्हायरसमुळे सक्तीच्या ब्रेकनंतर भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाचा (Australia) सामना करण्यासाठी सज्ज आहे. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी (Border-Gavaskar Trophy) भारत तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळण्यासाठी सध्या सिडनी (Sydney) येथे कसून सराव करत आहेत. पहिले दोन एकदिवसीय सामने आणि शेवटचे दोन टी-20 सिडनी येथे तर इतर दोन सामने कॅनबेरा येथे खेळले जातील. घरात खेळताना ऑस्ट्रेलिया पहिल्या टप्प्यात सलामी फलंदाज रोहित शर्माशिवाय असलेल्या भारतीय संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करू पाहत असतील. भारताचे विराट कोहली करेल, तर आरोन फिंच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. कोहली, जसप्रीत बुमराह, शिखर धवन आणि इतर सिनिअर खेळाडूंवर संघाचा भार संभाळण्याची अपेक्षा असेल, तर काही युवा खेळाडूंना वनडेमध्ये स्थान कमविण्याची संधी असेल. (IND vs AUS 2020-21 Full Schedule: वनडे मालिकेने सुरु होणार टीम इंडियाचे Mission Australia; जाणून घ्या वेळ, स्थळांसह संपूर्ण वेळापत्रक)
आज आपण नजर टाकूया अशा 5 खेळाडूंवर ज्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने आपल्या खेळाने सामन्याचे निर्णय बदलण्यासाठी सक्षम आहेत.
1. केएल राहुल
भारताचा नियमित सलामी फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात अली आहे. शिवाय, रोहितला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात असल्याने शिखर धवन सोबत राहुल डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. आयपीएलमध्ये राहुलने आपल्या खेळीने प्रभावी कामगिरी बजावली आहे, त्यामुळे त्याच्याकडून चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा असेल.
2. हार्दिक पांड्या
तंदुरुस्त असल्यास, हार्दिक ही व्हाईट-बॉल क्रिकेटमधील भारतातील सर्वात महत्वपूर्ण खेळाडू आहे. अष्टपैलूची स्फोटक क्षमता अतुलनीय आहे आणि गोलंदाजीसाठी उपलब्ध असल्यामुळे संघाला काम करण्याचे अधिक पर्याय उपलब्ध मिळेल. हार्दिकने त्याचा अखेरचा सामना 2019 न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल मॅचमध्ये खेळला आणि मोठ्या दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत. त्याने आयपीएलमध्ये फलंदाजीने चांगली कामगिरी केली, परंतु हार्दिकने गोलंदाजी केली नाही, त्यामुळे त्याला वगळले जाण्याची शक्यता फारच कमी असली तरी वनडे मालिकेद्वारे पुनरागमन करण्यासाठी त्याच्यासाठी कठोर टेस्ट असेल.
3. नवदीप सैनी
डेथ ओव्हर्समध्ये सैनी वेगवान आणि अचूक गोलंदाजी करण्यासाठी सक्षम असून बुमराह व मोहम्मद शमीसह तो फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून सैनीला संघात स्थान मिळू शकते आणि हे त्याच्यासाठी आपली योग्यता सिद्ध करण्याची मोठी संधी असेल. सैनीला यंदा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला फॉर्म मिळवून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू इच्छित असेल.
4. रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा बॅट आणि बॉलने संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. हार्दिक वगळता जडेजाला दुसरा अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळू शकते आणि कठीण मधल्या फळीची जबाबदारी स्वीकारू शकतो.
5. कुलदीप यादव
भारतीय संघाच्या थिंक टँकला प्रभावित करायचे असल्यास कुलदीपला बरेच काम करायचे आहे. कोहलीसाठी एक महत्त्वाचा खेळाडू, एक फॉर्म इन कुलदीप ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नक्की त्रास देऊ शकतो आणि भारतीय संघासाठी हे नक्की फायदेशीर असेल. पण त्याचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आयपीएलमध्येही त्याने फक्त पाच सामने खेळले आणि फक्त एक विकेट काढली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वास परत मिळवणे ही सुवर्णसंधी असेल.