IND vs AUS 2020-21: टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघात (India Tour of Australia) पुन्हा रुजू झालेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना स्पष्टपणे अल्टिमेटम दिला आहे. दोन्ही दुखापतग्रस्त खेळाडू सध्या बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) पूर्णपणे फिट होण्यासाठी घाम गाळत आहेत. आणि आता प्रशिक्षक शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे की हे दोन्ही खेळाडू जर एका आठवड्यात ऑस्ट्रेलियात पोहचले नाही तर कोणत्याही रेड-बॉल सामन्यात त्यांचा सहभाग "कठीण" होईल. "रोहितचे एनसीएमध्ये (NCA) काही टेस्ट होत आहेत आणि त्याला ब्रेक घेण्यास किती काळ आवश्यक आहे हे टेस्टद्वारे ठरवले जाईल, परंतु जर त्याला जास्त ब्रेक दिला तर परिस्थिती कठीण होऊ शकते कारण याचा अर्थ असा की त्यांना पुन्हा क्वारंटाइन राहावे लागणार. आणि यामुळे त्यांना कसोटी मालिका खेळणे कठीण होऊ शकते," रवि यांनी ABC Sport, या खाजगी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. (IND vs AUS 2020-21: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे, टी-20 मालिकेचा उत्साह शिगेला; 24 तासांत पाच सामन्यांच्या तिकीटांची झाली विक्री)
ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमांनुसार 14 दिवस क्वारंटाईनमध्ये रहाणे बंधनकारक आहे. दोन्ही देशांतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. 11 डिसेंबरपासून भारताला तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे त्यामुळे 10 डिसेंबरपूर्वी त्यांना क्वारंटाइनमधून बाहेर पडायचे असेल तर त्यांना 26 नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलिया पोहचावे लागणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा मर्यादित ओव्हरच्या मालिकेत न खेळण्यावर शास्त्री यांनी मौन सोडले. भारतीय प्रशिक्षक म्हणाले की, "तो कधीच व्हाईट बॉल मालिका खेळणार नव्हता, त्याला फक्त किती वेळ विश्रांतीची गरज आहे हे ते पाहत होते, कारण तुम्हाला जास्त दिवस आराम करणे परवडणार नाही. जर आपल्याला कसोटी मालिका किंवा कोणत्याही रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळायचे आहे, तर पुढील तीन किंवा चार दिवसांत आपण फ्लाइटमध्ये असाल. आपण नसल्यास ते कठीण होईल."
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बहुप्रशिक्षित कसोटी मालिकेपूर्वी तीन सामन्यांची वनडे मालिका 27 नोव्हेंबरपासून खेळली जाईल त्यानंतर तीन टी-20 सामने खेळले जातील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अॅडिलेड ओव्हल येथे 17 डिसेंबरपासून सुरू होईल आणि हा गुलाबी चेंडूने खेळला जाईल. चार सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली जाणार आहे.