IND vs AUS 2020-21 Test: 17 डिसेंबरपासून सुरू होणार्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आमने-सामने येतील. 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदा मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी (Team India) यंदा ऑस्ट्रेलियाचे कडू आव्हान असेल. पहिली कसोटी दिवस/रात्र मॅच असून अॅडिलेड (Adelaide) येथे आयोजित केली जाईल. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरील कसोटी मालिका ही सर्वात खास आहे, कारण ती आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप (World Test Championship) अंतर्गत खेळली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा गुलाबी चेंडूने दिवस/रात्र कसोटी सामना खेळला जाईल. यापूर्वी या दोन्ही संघ पिंक बॉल कसोटी सामना खेळले आहेत, परंतु पहिल्यांदा दोघे आमने-सामने येणार आहेत. चार सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला अवघे काही दिवस शिल्लक असताना आज आपण जाणून घेऊया सिरीजचे वेळ व स्थळासह संपूर्ण वेळापत्रक, ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टीव्ही प्रसारणाबद्दल संपूर्ण माहिती. (IND vs AUS 1st Test: पहिल्या पिंक-बॉल टेस्टसाठी मार्कस हॅरिस ऑस्ट्रेलियन संघात सामील, दुखापतीने Will Pucovski याचे पदार्पण लांबणीवर)
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 17 ते 20 डिसेंबर रोजी अॅडिलेड, दुसरा सामना 26 ते 30 रोजी मेलबर्न, 7 ते 11 जानेवारी रोजी सिडनीमध्ये तिसरा सामना आणि अंतिम सामना 15 ते 19 जानेवारी दरम्यान ब्रिस्बेन येथे खेळला जाईल. अॅडिलेडमधील सामना दिवस/रात्र सामना असल्याने भारतीय चाहते सकाळी 9:30 वाजल्यापासून याच आनंद घेऊ शकतात तर अन्य तीन सामने सकाळी 5:00 वाजता सुरु होतील. दरम्यान, 2017-18 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कसह ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या सर्व थेट प्रक्षेपण आणि थेट प्रवाहासाठी 6 वर्षांचा करार केला होता. त्यामुळे, भारतातील प्रेक्षक SonyLiv.com वर या मालिकेतील सामन्यांचा आनंद लुटू शकतात तर SonyLIV अॅपवर लाईव्ह प्रसारण पाहायला उपल्बध असेल. Sony SIX, Sony TEN 1, आणि Sony TEN 3 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका लाईव्ह प्रसारित करतील. Airtel पोस्टपेड आणि Jio यूजर्स अनुक्रमे एअरटेल स्ट्रीम आणि जिओ टीव्ही प्लॅटफॉर्मवर भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका लाईव्ह पाहू शकतात.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी संघ
भारत कसोटी संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ: टिम पेन (कॅप्टन), सीन एबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, नॅथन लायन, माइकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, मार्कस हॅरिस आणि डेविड वॉर्नर.