IND vs AUS 1st Test: अॅडिलेड (Adelaide) येथे पुढील आठवड्यात भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यासाठी मार्कस हॅरिसला (Marcus Harris) ऑस्ट्रेलियन कसोटी संघात (Australian Test Squad) जखमी डेविड वॉर्नरच्या (David Warner) जागी स्थान मिळाले आहे. मागील महिन्यात दुसर्या वनडे सामन्यात स्नायू दुखापतीनंतर वॉर्नरला यापूर्वी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते आणि त्यानंतर चार मर्यादित ओव्हरच्या सामान्यांनाही त्याला मुकावे लागले होते. वॉर्नर सध्या अॅडिलेड येथे प्रशिक्षण घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाही आणि मेलबर्न येथे बॉक्सिंग डे, दुसर्या कसोटी सामन्यात फिट होण्यासाठी पुनर्वसन सुरू आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघातील दुसऱ्या सराव सामन्यात दुखापत झालेल्या विल पुकोव्हस्की (Will Pucovski) पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे ज्यामुळे त्याचे पदार्पण लांबणीवर गेले आहे. “अलिकडच्या आठवड्यात झालेल्या दुखापतींची दखल घेत, मार्कसच्या कॅलिबरच्या एका खेळाडूला कसोटी संघात आणण्यास आम्ही भाग्यशाली आहोत," राष्ट्रीय निवडकर्ता ट्रेवर होन्स यांनी शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले. (IND vs AUS Test 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेत भारतासाठी कोण करणार डावाची सुरुवात? 'या' 3 सलामी जोडींचा आहे पर्याय)
“त्याच वेळी, आम्ही डेविड आणि विलबद्दल निराश आहोत की ते पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होणार नाहीत. विलच्या व्यवस्थापनासाठी आम्ही एक पुराणमतवादी दृष्टिकोन स्वीकारला आहे कारण त्याला कन्क्शनला सामोरं जावे लागला आणि बॉक्सिंग डे कसोटीच्या आधी तो आणि डेविड पूर्ण फिट होऊन परत येतील अशी आशा आहे.” शुक्रवारी ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाची संधी मिळवण्यासाठी आशावादी असणाऱ्या कॅमरून ग्रीनला सराव सामन्यात दुखापत झाल्याने हॅरिसची पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लागली.
JUST IN: Big selection news out of the Aussie camp ahead of the first #AUSvIND Test. The latest via @samuelfez. https://t.co/21w6zaXdaH
— cricket.com.au (@cricketcomau) December 12, 2020
17 डिसेंबर रोजी अॅडिलेडमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया-भारतमधील हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळती. भारताने मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध पहिल्यांदा पिंक बॉलने कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली होती.