IND vs AUS Test 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेत भारतासाठी कोण करणार डावाची सुरुवात? 'या' 3 सलामी जोडींचा आहे पर्याय
पृथ्वी शॉ, शुभमन गिल (Photo Credit: Instagram)

IND vs AUS Test 2020-21: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) ऑस्ट्रेलियावर (Australia) टी-20 मालिकेत विजय मिळवतमर्यादित ओव्हर क्रिकेट सकारात्मकपणे संपुष्टात आणली. विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे त्यांचे मुख्य गोलंदाज या दौर्‍याच्या व्हाईट-बॉल लेगच्या वेगवेगळ्या टप्प्यात शानदार फॉर्ममध्ये दिसले. याचबरोबर, कसोटी मालिकेपूर्वी ड्रममोने ओव्हल येथे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. पहिला सामना अनिर्णित राहिला. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावले इतर अनुभवी खेळाडूंनीदेखील मोलाचे योगदान दिले. तिसर्‍या वेगवान गोलंदाजाच्या जागेवर मोहम्मद सिराजने दावा ठोकला, तर रिद्धिमान साहाच्या अर्धशतकाने प्रवासी संघाला कठीण स्थितीतून बाहेर काढले. वेगवान विभागात डोकेदुखी असूनही, संघासाठी डावाची सुरुवात कोण असेल असा मोठा प्रश्न संघापुढे आहे. (IND-A vs AUS-A 2nd Tour Match: जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सराव सामन्यात ठोकले प्रथम श्रेणीतील पहिले अर्धशतक, षटकार मारत गाठला टप्पा)

पहिल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शुबमन गिल (Shubman Gill) सलामीची जोडी म्हणून अपयशी ठरले, तर दुसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालने डावाची सुरुवात केली. मात्र ते ही अपयशी ठरले. मयंक 2 धावाच करू शकला. मयंकने आजवर एकूण 11 कसोटी सामन्यात 974 धावा केल्या असून तो मालिकेत सलामीला येण्याची मोठी शक्यता आहे. दुसरीकडे, भारतापुढे मालिकेसाठी 3 सलामी जोडींचा पर्याय आहे.

1. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल 2018-19 दौऱ्यावर ऑस्ट्रेलियामध्ये एकत्र सलामीला खेळणार होते. सराव सामन्यात घोट्याच्या दुखापतीमुळे शॉला दुर्दैवाने मालिकेला मुकावे लागले. दोघे न्यूझीलंड 2020 दौऱ्यावर सलामी जोडी म्हणून मैदानावर उतरले जिथे त्यांना फारसे यश मिळाले नाही. पण, उंच कॅमरून ग्रीन आणि आक्रमक मिचेल स्टार्क शॉविरूद्ध बाऊन्स गोलंदाजी करतील ज्यामुळे कदाचित त्याला प्रारंभिक इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण दिसत आहे.

2. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल

अग्रवालची आणि त्याचा कर्नाटक सहकारी केएल राहुल याच्याबरोबर जोडी बनू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात दोघे सलामीला आले होते, जो राहुलचा अंतिम टेस्ट सामना होता. राहुल खराब फॉर्ममध्ये असल्याने फार काळ टिकू शकला नाही, पण राहुलच्या मर्यादित ओव्हरमधील फॉर्मने तिच्यासाठी पुन्हा कसोटी संघाचे दार उघडले आहे. कोहली मायदेशी परतल्यावर त्याचा मधल्या फळीत वापर केला जाऊ शकतो. मात्र, आघाडीच्या फळीत इन-फॉर्म आणि अनुभवी फलंदाजाचे स्थान रिक्त असल्याने राहुलला संधी मिळू शकते.

3. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल

शुभमन गिलने आयपीएल फ्रँचायझी केकेआरअस्थी सलामी फलंदाजी म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 33 धावांच्या आश्वासक खेळी करत त्याचे आपले कौशल्य दाखवले. पहिल्या सराव सामन्यात खेळल्यानंतर गिलला अधिक चांगला प्रतिसाद मिळाला आणि दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात 43 धावा केल्या. राहुल आणि शॉ अपयशी ठरत असताना गिलकडून मोठी अपेक्षा केली जात आहे.

यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यांना मुकणार असून नियमित कर्णधार विराट कोहली देखील पहिल्या सामन्यांनंतर मायदेशी परतणार आहे. अशा स्थितीत खेळाडूंना पुढाकार घेत मोठी खेळी करण्याची गरज असेल आणि त्यासाठी ते सलामी जोडीकडून प्रभावी सुरुवातीसाठी इच्छूक असतील.