टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळला गेला. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचीही सुरुवात केली. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरू होणार आहे. युवा सलामीवीर ईशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या कसोटीत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता दुसऱ्या सामन्यातही काही खेळाडू टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करू शकतात.
नवीन खेळाडूंना मिळू शकते संधी
दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने याबाबत मोठे संकेत दिले आहेत. कसोटी संघात समाविष्ट असलेला सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांनी आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. अशा स्थितीत या दोन्ही खेळाडूंना दुसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते. (हे देखील वाचा: IND vs WI 2nd Test 2023: दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी भारतीय संघानी घेतली माजी दिग्गज ब्रेन लाराची भेट, बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर)
सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील
विराट कोहली
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली उत्कृष्ट लयीत आहे. आशिया कप 2022 नंतर विराट कोहलीने मागे वळून पाहिलेच नाही. यादरम्यान विराट कोहलीने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील शतकाची प्रतीक्षा संपवली आहे. किंग कोहलीच्या बॅटने शेवटचे कसोटी शतक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीची आकडेवारी प्रभावी आहे. किंग कोहलीने 15 सामन्यात 898 धावा केल्या आहेत.
यशस्वी जैस्वाल
टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केले आणि पदार्पणाच्याच सामन्यात यशस्वी जैस्वालने 171 धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या कसोटीतही संघाला यशस्वी जैस्वालकडून मोठ्या आशा असतील.
रवींद्र जडेजा
टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा नेटवर घाम गाळत आहे. रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 6 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 2019 मध्ये रवींद्र जडेजानेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने दोन्ही डावांत मिळून एकूण पाच बळी घेतले.
आर अश्विन
वेस्ट इंडिजला सर्वात मोठा धोका आर अश्विनकडून आहे. पहिल्या कसोटीत आर अश्विनने घातक गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीत आर अश्विनने दोन्ही डावात मिळून १२ विकेट घेतल्या होत्या. अशा स्थितीत आर अश्विन दुसऱ्या कसोटीतही आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालू शकतो. मागील 20 कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, आर अश्विन 7 मध्ये मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.