IND vs WI 2nd Test 2023: दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी भारतीय संघानी घेतली माजी दिग्गज ब्रेन लाराची भेट, बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सराव सत्र पूर्ण करत आहे. दरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा, कोच राहुल दव्रिड तसेच अनेक भारतीय खेळाडू ब्रेन लारासोबत व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत.
Team India meets Brian Lara: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs WI) उद्या म्हणजेच 20 जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क येथे खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडूंनी दिग्गज ब्रेन लाराची भेट घेतली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सराव सत्र पूर्ण करत आहे. दरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा, कोच राहुल दव्रिड तसेच अनेक भारतीय खेळाडू ब्रेन लारासोबत व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत. (हे देखील वाचा: IND vs WI 2nd Test 2023: त्रिनिदाद कसोटीत मोडणार अनेक विक्रम; विराट कोहली, रोहित शर्मा, राहणे, गिलला सुवर्ण संधी)
पहा व्हडिओ
When in Trinidad, you do not miss catching up with the legendary Brian Lara 😃👏#TeamIndia | #WIvIND | @BrianLara pic.twitter.com/t8L8lV6Cso
— BCCI (@BCCI) July 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

