Team India (Photo Credit - Twitte)

डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा (IND vs WI) एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने चालू मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघ 20 जुलैपासून म्हणजेच गुरुवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्यात आमनेसामने असतील. हा सामना क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ, त्रिनिदाद येथे होणार आहे. या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांच्या खेळाडूंना अनेक मोठे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. (हे देखील वाचा: Team India In WTC: टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जिंकले आहेत सर्वाधिक सामने, जाणून घ्या इतर संघांची अवस्था)

कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध 1000 धावा करू शकतो पूर्ण 

कोहलीने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 15 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या 20 डावांमध्ये त्याने 44.90 च्या सरासरीने आणि 52.48 च्या स्ट्राइक रेटने 898 धावा केल्या आहेत. या कसोटी सामन्यात त्याने 102 धावा केल्या तर कॅरेबियन राष्ट्राविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो केवळ पाचवा फलंदाज ठरेल.

रहाणेला कपिल देवला मागे टाकण्याची संधी

अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 84 कसोटी सामन्यांच्या 143 डावांमध्ये जवळपास 39 च्या फलंदाजीच्या सरासरीने 5,069 धावा केल्या आहेत, ज्यात 12 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला धावांच्या बाबतीत कपिल देव (5,248) ला मागे टाकण्याची संधी असेल. यासाठी त्याला दोन्ही डावात 180 धावा कराव्या लागतील.

गिल कसोटीत करू शकतो 1000 धावा पूर्ण 

शुभमन गिलने 17 कसोटी सामने खेळले असून 32.89 च्या सरासरीने 927 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतकेही केली आहेत. दरम्यान, त्याची सर्वोत्तम कामगिरी 128 धावांची आहे. जर गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध 73 धावा केल्या तर त्याच्या 1000 कसोटी धावा पूर्ण होतील.

रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध 500 धावा पूर्ण करू शकतो

रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध 5 कसोटी सामने खेळले असून 112.66 च्या सरासरीने 440 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने सर्वाधिक 177 धावांसह 2 शतके झळकावली आहेत. रोहितने आणखी 60 धावा केल्या तर तो वेस्ट इंडिजविरुद्ध 500 धावा पूर्ण करेल.

होल्डरला 100 बळी पूर्ण करण्याची संधी 

या सामन्यात भारताशिवाय वेस्ट इंडिजचे खेळाडूही काही विक्रम करू शकतात. यामध्ये संघाचा अष्टपैलू जेसन होल्डरचा समावेश आहे. ज्यांच्या कसोटीत 92 विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. त्याने आणखी 8 विकेट घेतल्यास तो क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 100 बळी पूर्ण करेल.