न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (Photo Credit: PTI)

ICC WTC 2021-23: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दुसर्‍या आवृत्तीसाठी तसेच ऑगस्ट महिन्यात इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेने (ENG vs IND Series) सुरु होणार्‍या 2021-23 स्पर्धेसाठी नवीन गुण पद्धत आणि वेळापत्रकाची औपचारिक घोषणा केली आहे. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल यंदा प्रत्येक सामना समान गुणांसाठी लढवला जाईल.  विजयासाठी प्रत्येक संघाला 12 गुण, अनिर्णित ठरल्यास चार आणि बरोबरीसाठी सहा गुण दिले जातील. न्यूझीलंडने (New Zealand) डब्ल्यूटीसीच्या  (WTC) उद्घाटन आवृत्तीचे विजेतेपद पटकावल्यानंतर चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या आवृत्तीची तयारी पुन्हा सुरू झाली असून 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (पतौडी ट्रॉफी) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. (World Test Championship 2021-23: भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजने सुरु होणार दुसऱ्या WTC स्पर्धेचा महासंग्राम, टीम इंडिया खेळणार इतक्या कसोटी मालिका)

आयसीसीने नव्याने विकसित केलेल्या गुण प्रणालीमध्ये, संघाने खेळलेल्या सामन्यांमधून जिंकलेल्या उपलब्ध गुणांच्या टक्केवारीवर संघाची क्रमवारी निश्चित केली जाईल. कोणत्याही प्रकारची सामने आणि मालिका जरी खेळल्या असत्या तरीही, सिस्टम कोणत्याही क्षणी गुणतालिकेत असलेल्या संघांची सहज तुलना करण्यास सुलभ करेल. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत डब्ल्यूटीसी सायकलच्या दुसर्‍या आवृत्तीत एकूण सहा मालिका खेळणार्‍या नऊ कसोटी संघांचा सहभाग पाहायला मिळणार आहे. 2019 आणि 2021 दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या आवृत्तीप्रमाणेच प्रत्येकी संघ तीन घरी आणि तीन परदेशी मालिका खेळेल. तसेच भारत-इंग्लंड मालिका व्यतिरिक्त, जून 2023 मध्ये संपुष्टात येणाऱ्या दुसऱ्या चक्रातील इतर पाच सामन्यांच्या मालिकेत यज्ञा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अ‍ॅशेसचा देखील समावेश आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात आगामी चक्रात एकमेव चार सामन्यांची कसोटी मालिका असेल.

जाणून घ्या आयसीसी WTC 2021-23 नवीन पॉइंट्स सिस्टम

विजयासाठी पॉईंट्स: 12

अनिर्णित सामन्यासाठी: 4

टायसाठी पॉईंट्स: 6

याव्यतिरिक्त, संघांना स्लो-ओव्हर रेटच्या दंडाला देखील सामोरे जावे लागेल. ओव्हर मागे पडल्यास प्रत्येकी एक गुण वजा केला जाईल.