Pakistani Fan (Photo Credits: Getty)

India vs England: आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप आता मोठ्या रंजक वळणावर आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदा देखील उत्पांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र अजूनही उत्पांत्य फेरीतील तीन संघ कोणते असणार, याची उत्सुकता आहे. न्युझीलँड आणि भारतीय संघ उत्पांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता सर्वाधिक आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघ 12 पाईंट्सह अव्वल स्थानी आहे. तर न्युझीलँड (11 पाईंट्स) दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या स्थानी टीम इंडिया (9 पाईंट्स) आणि चौथ्या स्थानावर इंग्लंड (8 पाईंट्स) आहे. (Lords च्या बालकनीत लटकला पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमद, मिम्स बघून व्हाल लोटपोट)

बुधवारी (26 जून) झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने न्युझीलँडवर 6 विकेट्सने मात केली. हा न्युझीलँडचा वर्ल्डकपमधील पहिला पराभव होता. न्युझीलँडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारत  6 विकेट्स गमावत 237 धावा केल्या. हे लक्ष्य पाकिस्तानी संघाने 49.1 ओव्हरमध्ये केवळ 4 विकेट्स गमावत साध्य केले. (भारतापुढे पाकिस्तान 'झेल बाद', 'Most Dropped Catches' मध्ये अव्वल क्रमांकावर)

आज टीम इंडियाची लढत वेस्ट इंडिज संघासोबत:

या विजयानंतर उत्पांत्य फेरीत जाण्याची पाकिस्तान संघांची आशा कायम आहे. असे जरी असले तरी त्यांचा मार्ग सोपा नाही. यासाठी पाकिस्तानला येणारे दोन सामने जिंकणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडे सध्या 7 पॉईंट्स आहेत. त्यामुळे पुढील दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 11 पॉईंट्स होतील. याशिवाय पाकिस्तानचा उत्पांत्य फेरीतील मार्ग मोकळा होण्यासाठी इंग्लंड संघाचा पराभव होणे गरजेचे आहे.

इंग्लंड संघ पुढील 2 पैकी 1 सामना हरल्यास पाकिस्तान उत्पांत्य फेरीत धडक मारु शकेल. इंग्लंडचे पुढील दोन सामने भारत आणि न्युझीलँड विरुद्ध आहेत. रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार आहे. आपला उत्पांत्य फेरीतील मार्ग मोकळा व्हावा यासाठी संपूर्ण पाकिस्तानाला हा सामना भारताने जिंकावा असे वाटणार. पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी याबद्दल ट्विटही केले आहे.

रशीद लतीफ ट्विट:

पाकिस्तान शिवाय बांग्लादेश आणि श्रीलंका संघांकडे सेमीफायनल मध्ये पोहचण्याची संधी आहे. बांग्लादेशकडे 7 पॉईंट्स असून त्यांचे 2 सामने बाकी आहेत. तर श्रीलंका संघांकडे 6 पॉईंट्स असून त्यांचे 3 सामने बाकी आहेत.