(Image Credit: Twitter)

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) सध्या सोशल मीडियावर हॉट टॉपिक बनला आहे. भारतीय संघाकडून पराभवानंतर चाहते, विश्लेषक सर्फराज आणि संघावर कसून टीका करत आहे. आपल्या मागील सामन्यात पाकिस्तान ने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेआव्हान जिवंत ठेवले आहे. (ICC World Cup 2019: भारतापुढे पाकिस्तान 'झेल बाद', 'Most Dropped Catches' मध्ये अव्वल क्रमांकावर)

मात्र, भारताकडून झालेला पराभवा नंतर चाहते सर्फराजची प्रत्येक चूक हेरण्यासाठी जणू नेटिझन्स टपून बसले आहेत. आणि अशीच एक संधी पुन्हा सर्फराजनं नेटिझन्स ना दिली आणि त्यावरून नेटिझन्सने तयार केलेले मीम्स पाहून लोटपोट होण्याची वेळ नक्की येईल. नुकताच सर्फराजचा दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यांदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानी कर्णधार लॉर्ड्स (Lords) च्या प्रतिष्ठित बाल्कनीतून खाली बघताना दिसतोय. सर्फराज च हे चित्र दिसताच नेटिझन्सनी पुन्हा त्याला धारेवर धरले आणि हास्यास्पद मिम्स द्वारे ट्रोल केलं.

आता जर बॉल वर आला तर परत नाही मिळणार

आणि ऐक... वर येताना थंड पाण्याची बाटली घेऊन ये

फखर भाई... वर येताना २० रुपयाची भाजी घेऊन ये

आयसीसी विश्वकप मध्ये आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान भिडणार आहे. हा सामना पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचा आहे, सेमिफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी पाक संघाला हा सामना जिंकावा लागणार आहे. पाकिस्तानचे आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 6 सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते.