(Photo Credit: Getty Image)

'Catches win Matches', हे कोणी बरोबरच बोललं आहे. यंदाच्या विश्वकप मध्ये पाकिस्तान (Pakistan) संघाचं पुनरावलोकन केलं तर ते असे होईल. फलंदाजी- उत्कृष्ट, गोलंदाजी-छान आणि क्षेत्ररक्षण- अरेरे, या बद्दल तर काही न बोललेच बरे. संघाच्या पराभवच श्रेय त्यांच्या क्षेत्ररक्षणाला देणे योग्य आहे. एका सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रमाणे, आत्तापर्यंत पाकिस्तानी संघाने विश्वकप मध्ये सर्वात जास्त झेल सोडले आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत त्यांनी 14 कॅच सोडले आहेत, तर यजमान इंग्लंड (England) 12 झेल टिपण्यात अयशस्वी ठरला आहेत. (ICC World Cup 2019: 'भारताकडून पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली', पाकिस्तान प्रशिक्षक मिकी आर्थर चा खळबळजनक खुलासा

)

सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) च्या संघाने आतापर्यंत बॅट आणि बॉल ने चांगली कामगिरी केली आहे परंतु त्यांच्या फील्डिंगने त्यांना निराश केले आहे. दरम्यान, त्यांचे प्रशिक्षक मिकी आर्थर (Mickey Arthur) नेहमी क्षेत्ररक्षणा वर लक्ष केंद्रित करतात. माजी किवी आंतरराष्ट्रीय ग्रँट ब्रॅडबर्न हे त्यांचे फील्डिंग प्रशिक्षक आहेत. हे सर्व असूनही, पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाची पातळी घसरत जात आहे.

दुसरीकडे, त्यांचे आक्रमक प्रतिस्पर्धी भारताने फक्त एकच कॅच सोडला आहे, त्यांच्या पेक्षा तेरा कमी. आणि हेच भारतीय फील्डिंगची गुणवत्ता दर्शवते. पाकिस्तान संघाने विश्वकप मध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या 7 बाद 308 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 9 बाद 259 धावांपर्यंतच मजल मारता आली. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे 6 मॅचमध्ये 5 पॉईंट्स आहेत.