आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये भारताने पाकिस्तान वरील आपले वर्चस्व कायम ठेवत पाकिस्तान (Pakistan) चा 89 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर टीम इंडिया वर कौथुकांचा वर्षाव झाला तर पाकिस्तानी संघावर कसून टीका करण्यात आली. सर्व सामान्य चाहते, मीडिया आणि माजी क्रिकेटपटूंनी देखील संघावर हल्ला बोल केला होता. दुरीकडे, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर (Mickey Arthur) ने आपल्याला भारताकडून पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली असे वक्तव्य केले. (ICC Cricket World Cup 2019: विश्वकप मध्ये पुन्हा होऊ शकते भारत-पाकिस्तान लढत, जाणून घ्या कारण)
16 जून रोजी झालेल्या भारत (India)-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानी संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजी फ्लॉप ठरली त्यामुळे भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. यासंदर्भात बोलताना आर्थर म्हणाले, विश्वचषक सारख्या स्पर्धेत जेव्हा तुमचा एकदा पराभव होतो तेव्हा पुन्हा तुमचा पराभव होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक पराभवामुळे तुमच्यावरील तणाव वाढत जातो. भारतासारख्या संघाविरुद्ध खेळत असताना चाहत्यांच्या अपेक्षा जास्त असतात. सर्वांचे लक्ष तुमच्या कामगिरीवर असते. या सामन्यात खेळाडूंप्रमाणे माझ्यावर देखील दडपण होते. भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर मला आत्महत्या करावी वाटली.
दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत पाकिस्तानने जोरदार कमबॅक केलं. लॉर्ड्स (Lords) वर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघावर एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तान चे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत आणि सेमीफायनल साठी पात्र ठरण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे.