ICC Cricket World Cup 2019: विश्वकप मध्ये पुन्हा होऊ शकते भारत-पाकिस्तान लढत, जाणून घ्या कारण

आपल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर भारतीय संघाने आपले 5 पैकी 4 सामने जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारताने लीग स्टेज आपल्या पारंपारगत प्रतिस्पर्धी पाकिस्तान ला साठव्यांदा पराभूत केले. विश्वकप मधील हा सामना काहीसा एकतर्फी राहिला. भारताने सुरुवाती पासूनच पाकिस्तानवर वर्चस्व बनवूत 89 धावांची त्यांचा पराभव केला. मात्र, याच विश्वकप मध्ये पुन्हा एकदा भारत-पाक संघात अजून एक सामना खेळला जाऊ शकतो आणि तो ही सेमीफायनल मध्ये. (रोहित शर्मा ने साथिदारांसोबत इंग्लंडमध्ये 5 तासांच्या प्रवासादरम्यान मांडला 'डम शराज'चा डाव Video)

भारत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान सातव्या. भारतीय संघ आपले उर्वरित सामने जिंकून पहिले स्थान प्राप्त करू शकतो तर पाकिस्तान आपले उरलेले सामने जंकून चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केल्याने पाकिस्तानी संघाचे आता 6 सामन्यात 5 गुणा आहे. आता त्यांचा सामना न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान टीम शी होईल. जर त्यांनी सर्व तीन सामने जिंकले तर ते 11 गुण होतील. शिवाय या तीन संघाच्या कामगिरी वरही त्यांचे लक्ष असेल. सेमीफाइनलसाठी पात्र ठरण्यासाठी पाकिस्तान संघाने आशा करावी कि इंग्लंड एक पेक्षा जास्त सामना जिंकू नये आणि बांगलादेश आणि श्रीलंका ने प्रत्येकी एक-एक सामना गमवावा.  दुसरीकडे, टीम इंडिया ला सेमीफायनल गाठण्यासाठी दोन सामने जिंकण्याची गरज आहे.

भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज संघाशी 27 जुलै ला होईल तर पाकिस्तानचा सामना बलाढ्य न्यूझीलंड शी 26 जुलै ला एजबस्टन येथे खेळाला जाईल. भारत आणि न्यूझीलंड संघाने आता पर्यंत विश्वकप मध्ये एकही सामना गमावला नाही आहे. या दोन संघामधील सामना पावामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघाना एक-एक गन देण्यात आले होते.