रोहित शर्मा ने साथिदारांसोबत इंग्लंडमध्ये 5 तासांच्या प्रवासादरम्यान मांडला 'डम शराज'चा डाव (Video)
Rohit Sharma with Team India (Photo Credits: Instagram)

वर्ल्डकप 2019 च्या यंदाच्या साखळी सामन्यांमध्ये टीम इंडियाने चारही सामने जिंकत आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणारी टीम इंडिया मैदानाबाहेरही तितकीच मज्जा मस्ती करत आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकत्याच शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने प्रवासादरम्यान 'डम शराज' (Dumb Charades) खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

रोहित शर्माचा डम शराज खेळ

 

View this post on Instagram

 

5 hour drive - A little Netflix, a little charades and a lot of light conversation. PS - Excellent guess there Dk

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना.' 5 hour drive - A little Netflix, a little charades and a lot of light conversation' असं कॅप्शन दिलं आहे. भारताचा पुढील सामना 27 जून दिवशी वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान टीम इंडियाने इंग्लंडमध्ये खेळामधून वेळ काढून काही दिवसांपूर्वी सलमान खानचा 'भारत' सिनेमा बघितला होता.  ICC World Cup 2019 Team India Time Table: जाणून घ्या कधी, केव्हा आणि कुठल्या टीमसोबत भिडणार टीम विराटचे वीर

टीम इंडियाने मागील सामन्यात अफगाणिस्तान संघावर 11 धावांनी विजय मिळवला. भारत विरूद्ध अफगाणिस्तान या सामन्यात भारत सहज विजय मिळवेल अशी अनेकांची अपेक्षा होती मात्र शेवटच्या बॉलपर्यंत अफगाणिस्तान संघाने टीम इंडियाला कडवी टक्कर दिले.