ICC World Cup 2019 Team India Time Table: जाणून घ्या कधी, केव्हा आणि कुठल्या टीमसोबत भिडणार टीम विराटचे वीर
Team India (Photo Credits: IANS)

ICC Cricket World Cup 2019 : संपुर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो आयसीसी वर्ल्ड कप 2019 30 मे पासून म्हणजेच गुरुवारपासून सुरु होत आहे. ह्या टुर्नामेंटचा पहिला सामना टीम इंग्लंड (England)आणि दक्षिण आफ्रिका (South Africa)यांच्यामध्ये रंगणार आहे. तर दुसरीकडे भारतीय टीमचा (Team India) पहिला सामना 5 जूनला रोझ बाउल (Rose Bowl Stadium) साउथम्पटन (Southampton)मध्ये दक्षिण आफ्रिकेसह रंगणार आहे.

भारताच्या आतापर्यंतच्या वर्ल्ड कपच्या प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले तर, टीम इंडिया 1975 आणि 1979 मध्ये केवळ ग्रुप स्टेज पर्यंत सीमित राहिली. ह्या दरम्यान भारतीय संघाने 6 पैकी केवळ 1 चं मॅच जिंकली होती. त्यानंतर 1983 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा विजयी झाला. 1987 मध्ये त्यांचे इरादे खूप मजबूत होते मात्र टीम इंडिया सेमीफायनलचा पुढील प्रवास करु शकली नाही. 1992 मध्ये राउंड रॉबिन स्टेज पर्यंतच त्यांना समाधान मानावे लागले होते.

ICC World Cup 2019 Time Table: 30 मे पासून सुरू होणार क्रिकेटच्या विश्वविजेते पदाची चुरस; PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चं संपूर्ण वेळापत्रक

1996 मध्ये विश्व कप एशियामध्ये झाला, ज्यात भारत सुपर-6 पर्यंत पोहोचला. तर 2003 च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने मात दिली. 2007 मध्ये बांग्लादेश संघाकडून पराभूत होऊन ग्रुप स्तरावरच परत जावे लागले होते. मात्र पुन्हा एकदा 2011 मध्ये टीम इंडिया दुस-यांदा विजयी टीम बनली. त्यानंतर 2015 मध्ये भारताने सेमीफायनल पर्यंतच प्रवास केला.

ICC World Cup 2019 चे भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक

आयसीसी वर्ल्डकप 2019 चे जगभरातील दहाही संघाचे संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

  • 5 जून- भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका, रोज बॉल, साउथॅंप्टन
  • 9 जून- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, लंडन
  • 13 जून- भारत विरूद्ध न्यूझिलंड, ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम
  • 16 जून- भारत विरूद्ध पाकिस्तान, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • 22जून- भारत विरूद्ध अफगाणिस्तान, रोज बॉल, साउथॅंप्टन
  • 27 जून- भारत विरूद्ध विंडिज, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • 30 जून- भारत विरूद्ध इंग्लड, एजबस्टन, बर्मिंगहॅम
  • 02 जुलै- भारत विरूद्ध बांग्लादेश, एजबस्टन, बर्मिंगहॅम
  • 06 जुलै- भारत विरूद्ध श्रीलंका, हेडिंगले, लीड्स

ह्या वेळी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी या टीमचा कर्णधार विराट कोहली यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जर भारत हा विश्व कप जिंकला तर त्यात आश्चर्य करण्यासारखी काही गोष्ट नसेल. यंदा हा क्रिकेट विश्व कप इंग्लंडमध्ये होत आहे आणि भारतीय संघातील क्रिकेटपटूंना इथल्या परिस्थितीशी उत्तम रित्या जुळवून घेण्याचा अनुभव आहे. त्यामुळे पाहायचे हे आहे की यंदाचा ICC Cricket World Cup 2019 भारत जिंकतो की नाही.. लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी पहात रहा लेटेस्टली मराठी....