यंदाच्या विश्वकपमध्ये सेमीफायनलसाठी ची रेस रोमांचक होत चालली आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) ने यजमान इंग्लंड (England) चा 64 धावांनी पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलिया विश्वकपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. तर या पराभवामुळे इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 285 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना यजमानांना फक्त 221 धावा करता आल्या.(ENG vs AUS, World Cup 2019: डेव्हिड वॉर्नर ने केल्या 500 धावा, सचिन तेंडुलकर चा हा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता)
इंग्लंडच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त दुसऱ्या 3 संघाना देखील सर्वाधिक आनंद झाला असेल. आणि ती म्हणजे बांगलादेश (Bangladesh), पाकिस्तान (Pakistan)आणि श्रीलंका (Sri Lanka). इंग्लंडच्या पराभवाने या तीन संघाचे सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. सध्या बांगलादेश पाचव्या स्थानावर असून श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. तर इंग्लंड 7 सामन्यात 8 पॉईंट्स सह चौथ्या क्रमांकावर आहे.
इंग्लडचे आता दोन सामने उरले आहे. त्यात भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांचा समावेश आहे. अजून एका सामन्यात पराभव झाल्यास विश्वकपच्या सेमिफायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न, स्वप्नच बनून राहील. इंग्लंडचे पुढील दोन सामने अशा संघाशी आहेत जे स्पर्धेत अपराजित आहेत.