ENG vs AUS, World Cup 2019: डेव्हिड वॉर्नर ने केल्या 500 धावा, सचिन तेंडुलकर चा हा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता
(Photo Credit: Getty Image)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि अॅरॉन फिंच (Aaron Finch) यांनी भक्कम सुरूवात करून दिली. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरने दोन शतके झळकावली आहेत. वॉर्नरने यंदाच्या विश्वकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. वॉर्नर ने 7 मॅचमध्ये सर्वाधिक 500 धावा पूर्ण केल्या आहेत. एक वर्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर राहिलेल्या वॉर्नरला धावांची भूक लागली आहे हे स्पष्टपणे त्याच्या विश्वचषकमधील खेळने दिसून येते. वॉर्नर ने यंदाच्या स्पर्धेत अजून 3 अर्ध-शतक आणि 2 शकत ठोकले आहे. (ICC World Cup 2019: इंग्लंडचा 64 धावांनी पराभव करत, ऑस्ट्रेलिया संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश)

2019 च्या विश्वकप मध्ये 500 धावा करणारा वॉर्नर पहिला फलंदाज बनला आहे. शिवाय मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) आणि रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) नंतर 500 पेक्षा अधिक धावा करणारा वॉर्नर हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत.

तुटू शकतो सचिन तेंडुलकर चा १६ वर्ष जुना विश्वकप रेकॉर्ड

एका विश्वकप मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या नावावर आहे. 2003 च्या विश्वकप मध्ये सर्वाधिक 673 धावा करत सचिन ने 'गोल्डन बॅट' जिंकली होती. तेव्हापासून, विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे, परंतु यावेळी वॉर्नर ज्या पद्धतीने खेळतोय तो सचिनचा विक्रम मोडू शकतो असं म्हणणे चुकीचे नाही. वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया चा कर्णधार अॅरॉन फिंच देखील सचिनचा हा रेकॉर्ड मोडून काढू शकतो. फिंचने 7 सामन्यात 496 धावा केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध विजया सह ऑस्ट्रेलिया संघाने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 221 धावांपर्यंत मजल मारता आली. बेहरनडॉर्फ आणि स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा निम्मा संघ गारद झाला.