ICC Women's Cricket World Cup 2021 स्पर्धेच्या तारखा जाहीर; न्युझीलंडमध्ये रंगणार महिला क्रिकेट विश्वचषक
ICC Women’s Cricket World Cup 2021 (Photo Credits: ANI/Twitter)

आईसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. 2021 मध्ये रंगणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धा न्युझीलंडमध्ये होणार असून यात एकूण 8 संघ सहभागी होतील. 30 जानेवारी 2021 पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 31 सामने रंगतील. (ICC Women's T20 World Cup 2020: कसं असेल महिला 'टी-20 वर्ल्ड कप'चं वेळापत्रक?)

यापूर्वी न्युझीलंडमध्ये 1992, 2015 सालच्या पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर 2000 सालची महिला विश्वचषक स्पर्धा देखील न्युझीलंडमध्ये रंगली होती. त्यानंतर 2021 साली चौथ्यांदा न्युझीलंड विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवेल.

ANI ट्विट:

महिला विश्वचषक स्पर्धा 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरतील. तर संघांसाठी पात्रता स्पर्धा होईल.