ICC Women’s T20 World Cup 2020 (Photo Credits: ICC)

ICC Women's T20 World Cup 2020: आयसीसी टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महिला टी-20 वर्ल्ड कपचे सामने 21 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत रंगणार आहेत. यंदा प्रथमच पुरुष व महिला टी-20 वर्ल्ड कप एकाच वर्षी होणार आहे. (ICC Men's T20 World Cup 2020: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगेल भारताचा पहिला सामना; असे असेल T20 'वर्ल्डकप'चे वेळापत्रक)

अव्वल 8 संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले असून उर्वरीत दोन संघांसाठी पात्रता स्पर्धा होणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटात एक-एक संघ समाविष्ट होईल. (T20 World Cup 2020: थेट पात्र संघांची 'आयसीसी'कडून घोषणा)

A गटातील संघ

ऑस्ट्रेलिया

भारत

न्युझीलंड

श्रीलंका

B गटातील संघ

इंग्लंड

वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका

पाकिस्तान

21 फेब्रुवारीला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर पहिला सामना रंगणार आहे. पहिलाच सामना चार वर्षे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया या तगड्या संघासोबत होणार आहे. यापूर्वी भारतीय महिला संघ 2009, 2010 आणि 2018 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. त्यामुळे आता संघाकडून अधिक अपेक्षा आहेत. संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.icc-cricket.com/t20-world-cup/womens-fixtures

सिडनी येथे रंगणारे सामने:

पर्थ येथे रंगणारे सामने:

Canberra येथे होणारे सामने:

मेलबर्न येथे रंगणारे सामने:

 

5 मार्च रोजी उपांत्य फेरी होईल तर 8 मार्चला अंतिम सामना रंगणार आहे.