T20 World Cup 2020: थेट पात्र संघांची 'आयसीसी'कडून घोषणा

Men's T20 World Cup 2020 Qualifiers Schedule Announced: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी 2019) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा केली. ही स्पर्धा 2020मध्ये ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार एकूण 12 संघ थेट पात्र ठरले आहेत. आपल्या अधिकृत संसेतस्थळावरुन दिलेल्या माहितीत आयसीसीने म्हटले आहे की, पात्रतेच्या निकषानुसार यजमान ऑस्ट्रेलिया आणि अन्य नऊ संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत.

सुपर 12 संघांत थेट प्रवेश प्राप्त देश

भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूजीलँड, वेस्टइंडिज, आणि अपगानिस्तान हे संघ सुपर 12 संघांत थेट प्रवेशकर्ते ठरले आहेत. मात्र, माजी चँम्पीयन आणि तीन वेळा उपविजेता ठरलेल्या श्रीलंका आणि बांग्लादेश संघाला मात्र टूर्नामेंटच्या ग्रुपमधील इतर 6 क्वालीफायर्स संघांसोबत खेळावे लागणार आहे.

ऑस्ट्रोलियात रंगणार स्पर्धा

ही स्पर्धेचे 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या काळात ऑस्ट्रेलिया येथे आयोजन करण्यात आले आहे. निवड निकषांनुसार प्रमुख आठ संघांना थेट सुपर 12 मध्ये जागा मिळते. तर, इतर दोन संघांना अन्य संघांसोबत ग्रुपमध्ये खेळावे लागेल. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! मराठमोळी स्मृती मानधना यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू)

श्रीलंका, बांग्लादेशची नवी सुरुवात

दरम्यान, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूजीलँड, वेस्टइंडिज, आणि अपगानिस्तान हे संघ आपल्या कामगिरीची सुरुवात सुपर-12 मध्ये करतील. तर, बांग्लादेश आणि श्रीलंका या संघांना इतर क्वालीफायर संघांसोबत स्पर्थेच्या ग्रुप पातळीपासून सुरुवात करावी लागेल.