ENG vs NZ World Cup Final सामन्यासाठी आयसीसीने लॉर्ड्स मैदानाला घोषित केले 'नो फ्लाइंग जोन'
लॉर्ड्स क्रिकेट मैदान (Photo Credits: Getty Images)

यजमान इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात 14 जुलै रोजी लॉर्ड्स (Lords) च्या प्रतिष्ठित मैदानात आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात सुरक्षेच्या दृष्टीने लॉर्ड्स मैदानावर सामन्या दरम्यान एकही विमान नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यादरम्यान मैदानावर ‘नो फ्लाइंग झोन’ जाहीर करण्यात आला आहे. विश्वचषकच्या साखळी सामन्यावेळी पाकिस्तान (Pakistan)-अफगाणिस्तान (Afghanistan), इंग्लंड-ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) सामन्यादरम्यान एक हेलिकॉप्टर मैदानावरून गेले. या विमानाकर ‘जस्टिस फॉर कश्मीर’ संदेश लिहिण्यात आले होते. (ICC World Cup 2019: 'एम एस धोनी शिवाय टीम इंडिया जिंकूच शकत नाही', ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू स्टीव्ह वॉ याने केली 'कॅप्टन कूल' च्या समर्थानात बॅटिंग)

तसेच पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यावेळी असेच अनधिकृत विमान मैदानावरून गेले. या विमानावर ‘जस्टिस फॉर बलुचिस्तान’ हे शब्द मोठय़ा अक्षरांत लिहिले गेले होते.

दरम्यान, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातील पहिल्यांदा विश्वचषकचा मानकरी बनला जाईल. इंग्लंड संघ याआधी 1979, 1987 आणि 1992 मध्ये विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचला होता. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ सलग दुसऱ्यानंद विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचला आहे. किवी संघ याआधी 2015 च्या विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचला होता.