भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

कोविड-19 मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करीत आहे. आयसीसी ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चार महिने पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. परंतु याचा टीम इंडियावर (Indian Team) परिणाम होणार नाही आणि ते आणखी मजबूत स्थान कायम राखू शकते. टीम इंडियाने टेस्ट चॅम्पिअनशीपच्या (Test Championship) अंतर्गत चार टेस्ट मालिका खेळल्या आहेत, ज्यापैकी तीनमध्ये त्यांनी विजय मिळवला. काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ती मालिका या टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळण्यात आली होती. तीन मालिका जिंकून भारताने 360 गुणांची कमाई केली आणि चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. ऑस्ट्रेलिया तीन मालिका जिंकून 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कवी टीम 180 गुणांसह तिसऱ्या, इंग्लंड 146 गुणांनी चौथ्या, पाकिस्तानचे 140 गुण आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहेत. (Coronavirus Effect: क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यावर बॉल टेंपरिंग कायदेशीर करण्यावर ICC करू शकते विचार, वाचा सविस्तर)

आयसीसीच्या नियमानुसार चॅम्पियनशिप अंतर्गत देशाला सहा मालिका (तीन स्वदेशी, तीन परदेशी) खेळाव्या लागतात. भारतानं परदेशात दोन आणि दोन देशांमध्ये दोन मालिका खेळल्या आहेत. या सर्व मालिका दोन किंवा तीन कसोटी सामन्यांची होत्या, ज्यामध्ये भारतीय संघाला विजयानंतर पूर्ण गुण मिळाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मालिकेत एकावेळेस जास्तीत जास्त 120 गुण मिळवता येतात. अशाप्रकारे, दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्यावर 60 गुण आणि तीन सामन्यांच्या मालिकेत सामना जिंकल्यानंतर 40 गुण मिळतात. त्याचप्रमाणे चार आणि पाच सामन्यांच्या मालिकेत सामना जिंकून गुणांची संख्या 30 आणि 24 ने कमी होते. सामना टाय झाल्याने सामान गुण वाटले जातात, तर अनिर्णित दोन ते पाच सामन्यांच्या मालिकेत 20, 13, 10 आणि आठ गुण मिळणार.

दरम्यान, टीम इंडियाला चॅम्पियनशिपच्या अंतर्गत दोन मालिका अधिक खेळायच्या आहेत. वर्षअखेरीस टीम ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. भारताने 2018-19  विक्रम कायम राखला तर त्यांच्या गुणांमध्ये वाढ होऊ शकते. याशिवाय इंग्लंड टीम पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारताचा दौरा करणार आहे. भारताची चॅम्पियनशिप अंतर्गत ही अंतिम मालिका असेल. इंग्लंडने 2016 मध्ये भारताचा दौरा केला होता जिथे त्यांना 4-0 ने लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले होते.