इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 13च्या 22व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात गुरुवारी सामना होईल. गोलंदाजांच्या अपयशामुळे आजवर खराब कामगिरी करणारी पंजाब आणि हैदराबादला त्यांच्या फलंदाजांकडून अपेक्षा असतील. किंग्ज इलेव्हनने आजवर खेळलेल्या पाचपैकी चार सामने गमावले आहेत आणि गुणतालिकेत तळाशी आहेत, तर सनरायझर्सने तीन सामने गमावले आहेत आणि दोन जिंकले आहेत आणि सहाव्या स्थानावर आहेत. किंग्ज इलेव्हनची मजबूत बाजू ही त्याची सलामी जोडी आहे. निकोलस पूरण देखील चांगली भूमिका साकारत आहे, परंतु ग्लेन मॅक्सवेल अद्याप लयीत परतलेला नाही. चांगली फलंदाजी असूनही निराशाजनक गोलंदाजीमुळे किंग्ज इलेव्हनचा पराभव झाला. हैदराबादची स्थिती देखील तशीच आहे. फलंदाजांना वगळता गोलंदाज अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेले नाही. (SRH vs KXIP, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-
- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.