सुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील
हिमा दास (PTI Photo/Kamal Singh)

ब्रह्मपुत्रा (Brahmputra) नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्या कारणाने आसाम (Assam) च्या 30 जिल्ह्यांमधील पूर परिस्थिती कायम आहे. यामुळे 43 लाख लोक प्रभावित झाले आहे. शिवाय 80 हजार हेक्टरवर पीक वाया गेले आहे. 17,000 रहिवाश्यांना राहत शिबिरात ठेवलेले आहेत. आपल्या राज्याची अशी परिस्थितीत पाहीन धावपटू हिमा दास (Hima Das) हिने प्रशंसनीय पाऊल उचलले आहेत. केवळ दोन वर्षांपूर्वी रेसिंग ट्रॅकवर उतरलेल्या हिमाने मंगळवारी, राज्यातीळ पूर ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीत आपले एक महिन्याचे अर्धे वेतन दान केले आहे. हिमा चेक प्रजासत्ताकमध्ये क्लाडन एथलेटिक्स मीट मध्ये सहभागी झाली आहे.

हिमाने ट्विटकरत याबाबत माहिती दिली आणि मोठ्या कंपन्या आणि व्यक्तींना आसामच्या लोकांसाठी मदत करण्याचे अपील देखील केले.

दरम्यान, फिनलंडमध्ये 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 18 वर्षीय हिमाने 400 मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली. जागतिक स्तरावर अशा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय अॅथलिट आहे. आसामच्या नागाव जिल्ह्यातील कांधुलिमारी (Kandulimari) गावाची हिमा देशाची सुवर्णकन्या ठरली आहे.