ICC Women's World T20 Team : ICC महिला विश्व T20 संघाच्या कर्णधारपदी भारताची हरमनप्रीत कौरची (Harmanpreet Kaur)निवड करण्यात आली आहे. हरमनप्रीत सोबतच या संघामध्ये स्मृति मंदाना (Smruti Mandana) आणि पूनम यादव (Poonam Yadav) या दोन महिला खेळाडूंचा समावेश झाला आहे.
रविवारी, BCCI ने ट्विटनुसार, भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्टइंडिज,न्युझिलॅंड, बांग्लादेश, पाकिस्तानच्या खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. वर्ल्डकपमधील कामगिरीवरून या संघामध्ये खेळाडूंची निवड करण्यात येते. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडवर विजत मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्यांदा T20 चा वर्ल्डकप जिंकला.
महिला T20 मध्ये भारताला उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडने नमवले होते. तसेच उपांत्य सामन्यामध्ये मिताली राजचा संघामध्ये समावेश न झाल्यानेही बरीच चर्चा रंगली आहे. भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने मिताली राजला संघात स्थान मिळाल्याची खंत बोलून दाखवली आहे. मितालीला माझ्याप्रमाणेच संघात वागवणूक मिळत असल्याचं म्हटल आहे.
Presenting, the ICC Women's World T20 Team of the Tournament! 🙌@ahealy77@mandhana_smriti @amyjones313 @ImHarmanpreet@Dottin_5@ImJaveria@EllysePerry
Leigh Kasperek @Anya_shrubsole @kirstiegordon97
Poonam Yadav
Jahanara Alam#WT20 #WatchThis pic.twitter.com/nAou4eTo0a
— ICC World Twenty20 (@WorldT20) November 25, 2018
एलिसा हीली (ऑस्ट्रेलिया), स्मृति मंदाना (भारत), एमी जोंस (इंग्लैंड, विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (भारत, कप्तान), डियांड्रा डोटिन (वेस्टइंडीज), जोविरया खान (पाकिस्तान), एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया), लेग कास्पेरेक (न्यूजीलैंड), आन्या श्रबसोले (इंग्लैंड), क्रिस्टी गोर्डन (इंग्लैंड), पूनम यादव (भारत), 12वी खेळाडू: जहनारा आलम (बांग्लादेश).