GT Vs MI Head To Head: हार्दिक पांड्या आपल्या जुन्या संघाशी भिडणार, चुरशीची होणार लढत; पाहा हेड टू हेड आकडेवारी
MI vs GT (Photo Credit - X)

GT Vs MI IPL 2024 5th Match: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी (MI vs GT) होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना होणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात आपल्या जुन्या फ्रँचायझीला हरवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आयपीएल 2024 पूर्वी, एमआयने हार्दिक पांड्याला गुजरातला ट्रेड केले होते. यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले. हार्दिकच्या जाण्यानंतर शुभमन गिलकडे (Shubman Gill) गुजरात जायंट्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.

दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये निकराची लढत आहे. कोणताही संघ इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटत नाही. आयपीएलमध्ये मुंबई आणि गुजरात आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. मात्र, आता दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. अशा परिस्थितीत कोणता संघ कोणावर मात करतो हे पाहावे लागेल. (हे देखील वाचा: Punjab Beat Delhi: पंजाबने दिल्लीचा चार गडी राखून केला पराभव, लिव्हिंगस्टोनने षटकार मारून विजय केला साजरा)

एकूण सामने- 4

मुंबई इंडियन्स विजयी- 2

गुजरात टायटन्स विजयी- 2

नरेंद्र मोदी स्टेडियमची आकडेवारी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत जीटीने 6 सामने जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. या मैदानावर जीटीने प्रथम फलंदाजी करत 4 सामने आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे मुंबईने अहमदाबादमध्ये 4 सामने खेळले असून त्यांना फक्त 1 जिंकता आला आहे. याशिवाय एमआयला 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबईची आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल.