Punjab Beat Delhi: पंजाबने दिल्लीचा चार गडी राखून केला पराभव, लिव्हिंगस्टोनने षटकार मारून विजय केला साजरा

हा सामना पंजाबने 4 विकेटने जिंकून दिल्लीचा पराभव केला. तत्पुर्वी, पंंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना दिल्लीने पंजाबसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Punjab Beat Delhi: पंजाबने दिल्लीचा चार गडी राखून केला पराभव, लिव्हिंगस्टोनने षटकार मारून विजय केला साजरा
लियाम लिविंगस्टोन (Photo Credit: Twitter/IPL)

PBKS vs DC, IPL 2nd Match: आयपीएल 2024 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PK vs DC) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळवला गेला. हा सामना पंजाबने 4 विकेटने जिंकून दिल्लीचा पराभव केला. तत्पुर्वी, पंंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना दिल्लीने पंजाबसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्ससाठी स्टार फलंदाज शाई होपने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जसाठी स्टार अष्टपैलू सॅम कुरनने 63 धावांची शानदार खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 07:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).