हार्दिक पांड्या (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला मुंबई विमानतळावर घड्याळ जप्त केल्याच्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी सकाळी हार्दिक पांड्या द्वारे ट्विट करत सांगण्यात आले की, जेव्हा तो दुबईहून परत येत होता तेव्हा त्याने स्वत: कस्टम अधिकाऱ्यांना आपली घड्याळे दिली. हार्दिक याने अन्य सर्व जणांप्रमाणे आरोपांचा विरोध केला आहे. त्याचसोबत कस्टमच्या अधिकाऱ्यांना महत्वाची कागदपत्र सुद्धा दिल्याचे म्हटले आहे.

हार्दिक याने ट्विट करत असे म्हटले की, घड्याळांची किंमत 5 नव्हे तर 1.5 कोटी रुपये आहे. जो दावा सोशल मीडियात केला जात आहे तो चुकीचा आहे. त्याने पुढे असे म्हटले की, 15 नोव्हेंबरला सकाळी मी दुबईहून मुंबईत आलो. तेव्हा मी माझी बॅग घेतल्यानंतर स्वत: मुंबई विमानतळावर कस्टम काउंटरवर जात तेथून आणलेल्या वस्तू दिल्या. कस्टम ड्युटी सुद्धा भरली. सोशल मीडियात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. यामुळेच मला सर्वांना सत्य सांगायचे आहे.(क्रिकेटर हार्दिक पांड्या याची 5 कोटी रुपयांची दोन घड्याळे सीमा शुल्क विभागाकडून जप्त)

Tweet:

पुढे पांड्याने म्हटले की, मी दुबईहून जे सामान खरेदी केले त्याबद्दल मी परत आल्यानंतर त्याची स्वत: माहित दिली आणि कस्टम ड्युटी सुद्धा भरण्यास तयार आहे. कस्टम डिपार्टमेंटने महत्वाची कागदपत्रे मागितली असून ती मी देत आहे. कस्टम विभागाकडून हिशोब केला जात आहे. तो मी भरण्यास तयार आहे. त्याचसोबत घड्याळांची किंमत 1.5 कोटी रुपये आहे.

तसेच मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. सर्व एजेंसिचा सन्मान करतो. जे काही कागदपत्र हवे असतील त्याची पुर्तता कस्टम विभागाल देण्यास मी तयार आहे. माझ्या विरोधात जे आरोप लावले गेले ते पूर्णपणे चुकीचे आहेत.