हरभजन सिंह आणि सौरव गांगुली (Photo Credit: Twitter)

भारताचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यासोबत रविवारी एका कार्यक्रमात बॉलिवूडमधील लोकप्रिय गाणे ‘सेनोरीटा’ (Senorita) वर डान्स केला. भज्जी आणि गांगुलीने बंगाली क्विझ गेम शो, 'दादागिरी अनलिमिटेड',मध्ये झहीर  खान, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक माजी आणि सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंसह हजेरी लावली. या कार्यक्रमात गांगुलीने हरभजनसोबत डान्स केला. दोघांच्या डान्सचा एका व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी, प्रसिद्ध गायिका उषा उथुप यांनी बॉलिवूड चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चे गाणे गात होती. या गाण्यावर हरभजन नाचू लागला आणि गांगुलीला नाचायला लावले. शो दरम्यान भारतीय क्रिकेटपटू उषा उत्थुपच्या कामगिरीचा आनंद घेताना दिसले. (क्रिस गेल याचा तरुणीसोबत पबमध्ये डान्स, सोशल मीडियावर Video व्हायरल)

हरभजन आणि गांगुलीचा हा डान्स पाहून कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांनी याचा भरपूर आनंद लुटला. उषाने जसे सेनोरीटाचे गाणे सुरू केले तसे भज्जी नाचायला लागला आणि नंतर त्याने गांगुलीचा हात धरला आणि त्यालाही डान्स करण्यास प्रेरित केले. अन्य उपस्थित क्रिकेटपटू हसून टाळ्या वाजवू लागले. सुरुवातीला गांगुली संकोच करीत होता, परंतु नंतर त्याने काही डान्स स्टेप्स दाखवलेच. डान्स परफॉर्मन्सनंतर हरभजनने गांगुलीला मिठी मारली आणि नंतर दोघेही त्यांच्या जागी येऊन उभे राहिले. पाहा गांगुली आणि भज्जीच्या डान्सचा हा मजेदार व्हिडिओ:

गांगुलीच्या नेतृत्वात संघात 39 वर्षीय हरभजन उपस्थित होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 ची मालिका हरभजनसाठी ब्रेकआउट मालिका ठरली होती. या मालिकेत त्याने 3 कसोटीत 32 गडी बाद केले होते. कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये त्याने हॅटट्रिक नोंदवली होती. गांगुलीच्या नेतृत्वात हरभजन हा संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज मानला जात होता.