(File Photo)

Happy Birthday Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेटने चाहत्यांना अनेक संस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट (Indian Cricket) विश्वात अनेक खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या खेळीने एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) सारखे दुसरा कोणीच खेळाडू भारतीय क्रिकेट संघात पाहायला मिळाला नाही. आपल्या काळातील सर्वांत यशस्वी आणि सदाहरित शास्त्रीय फलंदाजांपैकी एक सुनील गावस्कर आज, 10 जुलैला आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील सर्वाधिक यशस्वी सलामीवीरां पैकी एक असलेल्या गावस्करकडे अनेक रेकॉर्ड आहेत. 1987 मध्ये क्रिकेटला अलविदा म्हणाल्या, 'लिटल मास्टर' च्या क्रिकेट मधील रेकॉर्ड सर्वपरिचित आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या आधी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा मान त्यांनी पटकावला होता. त्याच्या वाढदिसानिमित्त जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

एका वनडे सामन्यात खेळल्या 60 ओव्हर्स

एकदा सुनील गावसकरने यांनी वनडे सामन्यातील संपूर्ण 60 षटके खेळली आणि केवळ 34 धावा केल्या. त्याने धावांसाठी 174 चेंडू खेळत या धावा केल्या होत्या.

गावस्कर कदाचित मच्छीमार झाले असते

ही हेडलाईन वाचून तुम्हाला ही धक्का बसला असेल. पण जन्माच्या वेळी गावस्कर हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या मासेमारी करणाऱ्या दाम्पत्यांच्या मुलाबरोबर गावस्कर चुकून बदलले गेले. त्यांच्या पूर्ण कुटुंबात कोणाच्या ही धान्यात त्यांच्या बदलण्याची गोष्ट लक्षात आली नाही. पण त्यांच्या काकांना जेव्हा त्या बाळाच्या उजव्या कानावर जन्म खून दिसली नाही तेव्हा त्यांनी हॉस्पिटल अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि गावस्करयांना त्यांच्या खऱ्या कुटुंबात आणले गेले.

गावस्करयांचे वडिल त्यांना स्कूल क्रिकेटमध्ये केलेल्या प्रत्येक शतकासाठी 10 रुपये द्यायचे

हे एक सुप्रसिद्ध तथ्य आहे की काही प्रकारचे प्रोत्साहन नेहमी लोकांना मोठ्या गोष्टींकडे प्रेरित करते आणि गावस्कर यांचे वडील, मनोहर गावस्कर (Manohar Gavaskar) प्रेरित करण्यासाठी त्यांच्या स्कूल क्रिकेटमधील प्रत्येक शतकाची 10 रुपये द्यायचे. अशा प्रोत्साहनाची जोरावर गावस्कर यांनी आपल्या स्कूल क्रिकेटमध्ये अनेक शतकं केली.

त्याच्या काकांनी देखील क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

गावस्कर यांचे क्रिकेट खेळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे काका माधव मंत्री. मंत्री यांनी भारतीय संघासाठी 4 टेस्ट सामने खेळले, शिवाय ते मुंबई रणजी संघाचे मुख्य भाग होते. लहान असताना गावस्करयांना त्यांचे काका, माधव मंत्री (Madhav Mantri) यांच्या मालकीची भारताची टोपी घालायची होती पण त्यांनी हे सांगून मना केले की ही कॅप मिळवण्यासाठी घाम आणि कष्ट करावे लागतात. या गोष्टीचा गावस्कर यांच्यावर मोठा परिणाम झाला आणि अखेर त्यांनी 21 व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

गावस्करयांनी आपल्या मुलाचे नाव, रोहन, आपल्या क्रिकेटिंग आयडॉलनंतर ठेवलेत

आपल्याला भारतात कदाचित रोहन हे नाव एक सामान्य वाटत असेल. पण या नावाला सुनील गावसकरने त्याला लोकप्रिय केले होते जेव्हा त्याने आपल्या मुलाला आपल्या क्रिकेटिंग आयडॉलनंतर 'रोहन' असे नाव दिले होते.गावसकरयांनी 1965 साली ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरुद्धच्या दिग्गज रोहन कन्हई (Rohan Kanhai) स्कुलबाय म्हणून खेळात असताना पहिले. गावस्कर त्यांच्या फलंदाजीच्या शैलीचे फॅन होते. म्हणून, गावकर जेव्हा एका मुलाचे पिता झाले त्यांनी त्याच्या आपल्या क्रिकेटिंग आयडॉलला श्रद्धांजली म्हणून आपल्या मुलाला त्यांचे नाव दिले.

गावस्कर एक अभिनेता देखील आहे

गावस्कर यांनी क्रिकेट सोबतच मराठी चित्रपटात देखील अभिनय साकारला आहे. मराठी चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्या पत्नीने त्यांना प्रोत्साहित केलं होत. 1980 साली 'सावली प्रेमाची' या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेता अरुण सरनाईक, श्रीराम लागू (Sriram Lagu) यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदी सिने सृष्टीत देखील पाऊल टाकले आहे. 1988 सालच्या 'मालामाल' (Malamaal) या नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah), पूनम धीलोन (Poonam Dhillon) यांच्या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली.

पश्चिम बंगालची मिष्टी ही त्यांची आवडती मिठाई

सुनील गावस्कर यांना मिठाई अत्यंत आवडते असे म्हटले जाते. आणि त्यात पश्चिम बंगालची मिष्टी दोई किंवा गोड दही हे त्यांना सार्वधिक प्रिय आहे. कोलकातामध्ये असताना मिष्टी दोई एकदा तरी खावी याची ते दक्षता घेतात. आणि चाहत्यांनी किती तरी वेळा गावस्कर यांना हातात मिष्टी दोईच्या वाडगासह भाष्य करताना देखील पहिले असेल.

गावस्कर यांना कुस्ती करणारा व्हायचे होते

लहानपणापासून सुनील गावस्कर यांना कुस्ती करणारे व्हायचे होते. ते महान कुस्तीपटू मारुती वेदर यांचे फॅन होते. त्यांचा क्रिकेटमध्ये रस त्यांचे काका माधव मंत्री यांना खेळताना वाढला.

कुत्र्याला घाबराचे गावस्कर

आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीत गावस्कर कोणत्याही गोलंदाजाला घाबरले नाही. पण भारतीय क्रिकेटचा हा महान खेळाडू कुत्राची भीती वाटायची. इंग्लंडचे महान अष्टपैलू इयान बोथम यांनी एकदा गावस्करला एका फोनबूथ मध्ये कोंडून ठेवले होते. प्रत्यक्षात, बोथम फोनबुथच्या बाहेर एका कुत्रासोबत उभे होते. गावस्कर यांनी बऱ्याच विनंत्या केल्या नंतर ते तेथून बाहेर पडू शकले.

फर्स्ट-क्लास डेब्यू

1968/69 मध्ये गावस्कर यांनी कर्नाटक विरुद्ध सामन्यातून फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आणि पहिल्याच सामन्यात ते शून्य धावावर बाद झाले.