Photo Credit- X

Gujarat Titans And Rajasthan Royals, TATA IPL 2025 23rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. आयपीएलच्या (IPL) या हंगामात 10 संघ ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. दर हंगामाप्रमाणे, यावेळीही टाटा आयपीएल 2025 मध्ये एकूण 74 सामने खेळले जातील. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) एकमेकांच्या समोर असतील. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आतापर्यंत एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने फक्त दोन सामने जिंकले आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या काळात गुजरात टायटन्सने विजय मिळवला होता. आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा एकमेव विजय नोंदवला.