
Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान राॅयल्सचा 58 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्सचा संघ 19.2 षटकात 10 गडी गमावून 159 धावा करु शकले.
Match 23. Gujarat Titans Won by 58 Run(s) https://t.co/raxxjzY9g7 #GTvRR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2025
साई सुदर्शनची 82 धावांची शानदार खेळी
दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 6 गडी गमावून राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरातकडून साई सुदर्शनने 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय जोस बटलर आणि शाहरुख खानने प्रत्येकी 36-36 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थान राॅयल्स संघाकडून गोलंदाजीत तुषार देशपांडे आणि महेश थीकशना यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने 19.2 षटकांत 10 गडी गमावून 159 धावा केल्या. राजस्थान राॅयल्सकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, संजू सॅमसनने 41 धावा केल्या. पण संघाला विजयापर्यच पोहचवू शकले नाही. त्याच वेळी, गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रशीद खान आणि साई किशोरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.