
GT vs PBKS IPL 2025 Key Players To Watch Out: इंडियन प्रीमियर लीग 2025चा 5वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबाद येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच हंगामात 2022 चे आयपीएल विजेतेपद जिंकले, तर पंजाब किंग्जने अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ते फक्त दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पंजाब किंग्जसाठी खराब सुरुवात घातक ठरू शकते. कारण भूतकाळात अनेक वेळा संथ सुरुवातीमुळे त्यांच्या हंगामाच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्याशिवाय, पंजाब किंग्ज नवीन प्रशिक्षक आणि कर्णधारासह हंगामाची सुरूवात करत आहेत. त्यांनी श्रेयस अय्यर, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहल अशा तरुण खेळाडूंना संधी दिली आहे.
शुभमन गिल-अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा असा एक खेळाडू आहे. ज्याने पंजाब संघाविरुद्ध 500 पेक्षा जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये हा सर्वोत्तम आहे. अर्शदीप सिंगविरुद्ध तो खेळताना एक रोमांचक सामनाही तयार होतो. आयपीएलमध्ये हे दोघे आठ वेळा आमनेसामने आले आहेत आणि अर्शदीपला फक्त एकदाच गिलला बाद करण्यात यश आले आहे. गेल्या हंगामात, त्याने पॉवरप्ले दरम्यान सात बळी घेतले. जी मोठी कामगिरी आहे.
श्रेयस अय्यर-रशीद खान
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत येत आहे. तो मधल्या षटकांमध्ये रशीद खानविरुद्ध सामना करण्याचा प्रयत्न करेल,जे आव्हानात्मक असेल. अय्यर फिरकी गोलंदाजांमध्ये कुशल असला तरी, लेग-स्पिनर्सविरुद्ध त्याची कामगिरी अलिकडच्या काळात चांगली राहिलेली नाही.
युझवेंद्र चहल विरुद्ध जोस बटलर
लक्ष देण्यासारखी आणखी एक रोमांचक लढत जोस बटलर आणि युझवेंद्र चहल यांच्यात आहे. बटलरला गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला आवडते. परंतु चहल त्याच्या फिरकीने फलंदाजांना फसवण्याच्या क्षमतेने युक्त आहे. जर बटलरला त्याची लय सापडली तर तो खरोखर चहलला जड जाऊ शकतो परंतु जर चहलला लय साधता आली तर बटलरसाठी ते कठीण होऊ शकते.
श्रेयस अय्यर विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर
श्रेयस अय्यरला वॉशिंग्टन सुंदरच्या ऑफ-स्पिनचाही सामना करावा लागेल. अय्यर सहसा फिरकी गोलंदाजांना चांगले हाताळत असला तरी, सुंदर त्याला कर्व्हबॉल टाकू शकतो.