Narendra Modi Stadium (Photo Credit - Twitter)

GT Vs LSG Pitch Report: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या (IPL 2025) च्या 64 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) चा सामना आज 22 मे रोजी, गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होत आहे. हा सामना गुजरातचे होम ग्राउंड (Narendra Modi Stadium) अहमदाबाद येथे खेळला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरेल. गुजरातपुढे हा सामना जिंकून टॉप टूमध्ये आपले स्थान पक्के करायचे आव्हान आहे. दुसरीकडे, मागील सामन्यात पराभव पत्करून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौदेखील विजय नोंदवून इच्छील.

हवामान अंदाज - अहमदाबाद

अ‍ॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार, अहमदाबादमधील तापमान खेळाच्या सुरुवातीला सुमारे 37 अंश सेल्सिअस असेल आणि शेवटी ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. सामन्याच्या वेळेत आर्द्रतेत सुमारे 37% ते 49% पर्यंत चढ-उतार होईल. आकाश स्वच्छ राहील आणि संपूर्ण सामन्यात पावसाची शक्यता नाही. गुजरात टायटन्सचा लखनौसोबत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होईल. गुजरातसाठी हा एक महत्त्वाचा सामना असेल कारण ते प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरले असल्याने टॉप-टूमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

खेळपट्टी अहवाल:

2025च्या आयपीएलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप फायद्याची ठरली आहे. त्यामुळे, फलंदाजांचा धावांचा उत्साह पाहायला मिळत आहे. आजही फलंदाज चांगील कामगिरी दाखवतील अशी अपेक्षा आहे. विशेषतः घरच्या मैदानावर गुजरातकडून ही अपेक्षा आहे. तेही त्या गोष्टीचा चांगला फायदा उचलतील.

आयपीएल आकडेवारी आणि नोंदी

खेळलेले सामने: 42

पहिल्या डावात विजयी संघ: 19

दुसऱ्या डावात विजयी संघ: 21

निष्कर्ष न मिळालेले सामने: 1

पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 175

सर्वाधिक संघ एकूण धावसंख्या: 243

यशस्वी पाठलाग केलेला सर्वाधिक धावसंख्या: 205