
How Many Creases Are There in Cricket?: भारत हा क्रिकेट चाहत्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात क्रिकेट हा धर्मापेक्षा कमी नाही. म्हणून गुगल सर्चने क्रिकेट चाहत्यांसाठी गुगली (Googly) अनलॉकद्वारे एक गेम आणला आहे. ज्यात क्रिकेटशी संबंधीत एक प्रश्न विचारला आहे. भारतात सध्या जगात प्रसिद्ध असलेली क्रिकेट लीग आयपीएल (Indian Premier League) सुरू आहे. त्यामुळे चाहते क्रिकेटमध्ये गुंतलेले आहेत. क्रिकेटबद्दल आधिक शिकता याव, उत्सुकता वाढावी म्हणून गुगल सर्चने क्रिकेट चाहत्यांसाठी गुगली अनलॉकद्वारे एक गेम आणला आहे. ज्यात त्यांनी क्रिकेटमध्ये किती क्रिज असतात? (How Many Creases Are There in Cricket) हा प्रश्न विचारली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हा एक उत्सव आहे. त्याआधी गुगलीज म्हणजे काय जाणून घेऊ.
गुगलवरील गुगलीज म्हणजे काय?
गुगलीज किंवा गुगल सर्च गुगलीज हा गुगल सर्चचा एक नवीनतम गेम आहे. जो क्रिकेटसाठी कुतूहल वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. गुगलीज लोकांना खेळाबद्दल जागृत करण्यासाठी. मनोरंजक प्रश्न घेऊन आले आहे. ज्यामध्ये जाण्यासाठी ते लोकांना आमंत्रित करते. सहा आठवड्यांत, वापरकर्त्यांसाठी 50 गुगलीज येतील. जे खेळाशी संबंधीत कोणतेही प्रश्न असतील. ज्यांची उत्तरे चाहते देतील.
क्रिकेटमध्ये किती क्रीज असतात?
क्रिकेटच्या खेळपट्टीवर 22 यार्डच्या प्रत्येक बाजूला स्टंपचे दोन संच असतात. प्रत्येक स्टंपभोवती चार क्रीज असतात. एक पॉपिंग क्रीज, एक बॉलिंग क्रीज आणि दोन रिटर्न क्रीज. बॉलिंग क्रीज 22 यार्ड म्हणजेच 2012 सेंटी मीटर अंतरावर असतात आणि खेळपट्टीच्या टोकांना चिन्हांकित करतात. प्रत्येक स्टंपच्या समोर खेळपट्टीच्या प्रत्येक टोकावर एक पॉपिंग क्रीज काढला जातो. पॉपिंग क्रीज बॉलिंग क्रीजच्या समोर 4 फूट आणि समांतर असते आणि अशा प्रकारे दुसऱ्या पॉपिंग क्रीजपासून 58 फूट अंतरावर असते. पॉपिंग क्रीज हे अशा क्षेत्राच्या कडा असतात जे फलंदाजांसाठी "असुरक्षित क्षेत्र" असते. जर ते पॉपिंग क्रीजच्या सुरक्षिततेच्या बाहेर असतील तर ते स्टंप्ड किंवा रन आउट होऊ शकतात.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी पॉपिंग क्रीजचा वापर गोलंदाजाने नो-बॉल टाकला आहे की नाही याची चाचणी म्हणून केला जातो. नो-बॉल टाळण्यासाठी, चेंडूच्या स्ट्राईडमध्ये गोलंदाजाच्या पुढच्या पायाचा काही भाग पॉपिंग क्रीज उतरताना मागे असावा.
स्टंपच्या प्रत्येक सेटच्या प्रत्येक बाजूला एक, चार रिटर्न क्रीज काढल्या जातात. रिटर्न क्रीज पॉपिंग क्रीज आणि बॉलिंग क्रीजला लंब असतात. रिटर्न क्रीज प्रामुख्याने गोलंदाजाने नो-बॉल टाकला आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी वापरल्या जातात. नो-बॉल टाळण्यासाठी, चेंडूच्या स्ट्राईडमध्ये गोलंदाजाचा मागचा पाय आत असावा आणि रिटर्न क्रीजला स्पर्श करू नये.
आजच्या गुगलच्या प्रश्नाचे उत्तर शोधले तर उत्तर एकूण आठ क्रिज असतात