ग्लेन मैक्ग्रा (Photo Credit: Getty)

हॅटट्रिक घेणे हे क्रिकेटच्या खेळातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. तीन सलग चेंडूवर फलंदाजाला बाद करणे सर्व गोलंदाजांना शक्य होत नाही. फलंदाजाने तिहेरी शतक करणे जितकी कठीण आणि दुर्मिळ घटना आहे तितकच हॅटट्रिक देखील कठीण आहे. तसेच अव्वल फळीतील फलंदाज बाद करून हॅटट्रिक घेणे खूप कठीण आहे आणि यात केवळ काही मोजक्या गोलंदाजांना यश मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मैक्ग्रा (Glenn McGrath) यांनी डिसेंबर 2000 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. त्यांनी शेरविन कैंपबेल, ब्रायन लारा (Brian Lara) आणि जिमी एडम्स यांना सलग चेंडूवर बाद करून हॅटट्रिक घेतली होती. हॅटट्रिक दरम्यान लारा सारख्या दिग्गज खेळाडूला बाद करणे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी कामगिरी आहे. पण त्याच्या स्वप्नातील हॅटट्रिकची संकल्पना काहीशी वेगळी आहे. आतापर्यंत हा खेळ खेळणारा मॅकग्रा सर्वात महान वेगवान गोलंदाज आहे यात शंका नाही. त्याने सुरुवातीस आपल्या इंच परिपूर्ण लाईन आणि लांबीने फलंदाजांना आश्चर्यचकित केले आहेत. (विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या तुलनेवर जहीर अब्बास यांचे मोठे विधान, सर्व फॉर्मेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून 'या' क्रिकेटरची केली निवड)

ईएसपीएनक्रिकइन्फोने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मैक्ग्राने आपल्या तीन ड्रीम हॅटट्रिकचा भाग असणार्‍या तीन फलंदाजांची नावं जाहीर केली. यात दोन भारतीय-सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड तर एक वेस्ट इंडियन ब्रायन लारा यांचा समावेश आहे. “हॅट्ट्रिकची इच्छा यादी ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची असेल,” मैक्ग्रा म्हणाले. मैक्ग्रा यांनी व्हिडिओमध्ये त्याच्या खेळण्याच्या दिवसांशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

दरम्यान, मैक्ग्रा यांनी 14 वर्ष ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी 124 कसोटी सामने आणि 250 एकदिवसीय सामने खेळले. शिवाय, ऑस्ट्रेलियाने क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या संघाचे ते सदस्य होते. त्यांनी कारकिर्दीत 563 कसोटी आणि 381 एकदिवसीय विकेट्स घेतल्या आणि 2 टी-20 सामन्यात 5 गडी बाद केले आहेत.