ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पण, त्याआधीच ग्लेन मॅक्सवेल हेडलाईन बनला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची संघात निवड झालेली नाही ही वेगळी बाब आहे. पण, ज्या कारणांमुळे तो रुग्णालयात पोहोचला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या भुवया उंचावल्या आहेत. वास्तविक, मॅक्सवेलने एका पार्टीत इतकी दारू प्यायली की तो बेशुद्ध झाला. त्याच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा - Glenn Maxwell, Fastest ODI World Cup Century: ग्लेन मॅक्सवेलने रचला इतिहास, 40 चेंडूत ठोकले विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक)
मॅक्सवेलला अॅम्ब्युलन्सने अॅडलेडमधील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांना रॉयल अॅडलेड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पबमध्ये पार्टी करताना मॅक्सवेलसोबत काय घडले याची क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही माहिती नाही आणि मिळालेल्या माहितीनुसार ते आता मॅक्सवेलच्या प्रकरणाची चौकशी करणार असून कारवाई करण्याच्या मनस्थितीतही आहे.
मॅक्सवेलचा दारूमुळे जीव धोक्यात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील आयपीएल 2017 मध्ये त्याच्यासोबत दारूशी संबंधित अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स यांच्यात हा सामना होता. त्या सामन्यापूर्वी मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या व्यवस्थापकाला न सांगता गुजरात लायन्सच्या प्रवर्तकाच्या पार्टीत पोहोचला.