आईसीसी चैंपियंस ट्रॉफी (Photo Credit: X/@ICC)

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारीपासून (ICC Champions Trophy 2025) सुरू होत आहे. दरम्यान, शनिवारी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. तथापि, भारताव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचे संघ जाहीर केले आहेत. आतापर्यंत यजमान पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ (Team India Squad)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश संघ (Bangladesh Squad)

नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमॉन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब आणि नाहिद राणा.

हे देखील वाचा: India Squad For England ODI Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' युवा वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ (New Zealand Squad)

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान संघ (Afghanistan Squad)

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ (England Squad)

जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (Australian Squad)

पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅडम झांपा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Squad)

टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, अँरिक नोर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रसी व्हॅन डर ड्यूसेन