Team India (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी (IND vs ENG ODI Series 2024) टीम इंडियाची घोषणा (Team India) करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी संघाची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ सारखाच आहे, जसप्रीत बुमराहच्या जागी फक्त हर्षित राणाला (Harshit Rana) एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

टीम इंडियासाठी महत्वाची मालिका

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची तयारी तपासण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. एकदिवसीय विश्वचषकानंतर मोहम्मद शमी एकदिवसीय मालिकेत परतला आहे. (हे देखील वाचा: Champions Trophy 2025: मोहम्मद सिराजला टीम इंडियामधून वगळण्यात आले, चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळाले नाही स्थान)

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ (India Squad For England ODI Series)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हर्षित राणा.

भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (IND vs ENG ODI Series Schedule)

पहिला एकदिवसीय सामना - 6 फेब्रुवारी, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर

दुसरा एकदिवसीय सामना - 9 फेब्रुवारी, बाराबती स्टेडियम, कटक

तिसरा एकदिवसीय सामना - 12 फेब्रुवारी, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद