Ranji Trophy 2025: रणजी ट्रॉफी 2024-25 चा दुसरा टप्पा सुरू (Ranji Trophy 2025) झाला आहे. आज मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर (Mumbai vs Jammu and Kashmir) यांच्यातही एक सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील मुंबईकडून खेळत आहे. या सामन्यात मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्या जोडीने डावाची सुरुवात केली. हे दोन्ही खेळाडू अपयशी ठरले. रोहित शर्माने पुन्हा एकदा त्याच्या खराब फलंदाजीने चाहत्यांना निराश केले आहे. (हे देखील वाचा: India Beat England, 1st T20I 2025 Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय, अभिषेक शर्माच्या 34 चेंडूत 79 धावा)
Rohit Sharma, Yashasvi Jaiswal departs early scoring 3 and 4 runs in Ranji Trophyhttps://t.co/S1kUbxmvGr#RohitSharma #YashasviJaiswal #RanjiTrophy #Cricket #Mumbai #Ranji #ShubmanGill pic.twitter.com/xCGXCJ9GjY
— NewsDrum (@thenewsdrum) January 23, 2025
रोहित 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये परतला आणि अपयशी ठरला
अलिकडेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळून परतली. या मालिकेत टीम इंडियाला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब होती. त्यामुळे रोहितने सिडनी कसोटीतून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर रोहित शर्मानेही रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला. रोहित 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये परतला आणि पहिल्याच सामन्यात तो अपयशी ठरला.
यशस्वी जैस्वाल 4 धावा करुन बाद
या सामन्यात, यशस्वीने मुंबईसाठी डावाची सुरुवात केली पण तोही धावा करू शकला नाही आणि पहिल्या डावात उमर नझीरने त्याचा डाव 4 धावांवर संपवला. नुकताच यशस्वी जैस्वालची इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जैस्वालने वनडेमध्ये पदार्पण केले नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत त्याच्यावर सर्व चाहत्यांचे लक्ष असेल.