India Beat England, 1st T20I 2025 Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय, अभिषेक शर्माच्या 34 चेंडूत 79 धावा

अर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

India Beat England, 1st T20I 2025 Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय, अभिषेक शर्माच्या 34 चेंडूत 79 धावा
अभिषेक शर्मा (Photo Credits: BCCI/Twitter)

India National Cricket Team vs England National Cricket Team, 1st T20I 2025 Match Scorecard Update:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (T20 Series)  यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच २२ जानेवारी रोजी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील (Kolkata)  ईडन गार्डन्सवर (Eden Gardens)  खेळवण्यात आला. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या  (Jos Buttler)  खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  करत आहे.

पाहा स्कोअरकार्ड

दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन्ही सलामीवीर केवळ १७ धावांवर बाद झाले. संपूर्ण इंग्लंड संघ निर्धारित 20 षटकांत 132 धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 68 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान, जोस बटलरने 44 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. जोस बटलर व्यतिरिक्त हॅरी ब्रुकने १७ धावा केल्या.

दुसरीकडे, अर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 षटकांत 133 धावा कराव्या लागल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने 12..5 षटकांत फक्त तीन विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने 79 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या धमाकेदार खेळीदरम्यान, अभिषेक शर्माने 34 चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकार मारले. अभिषेक शर्मा व्यतिरिक्त संजू सॅमसनने 26 धावा केल्या.

त्याच वेळी, जोफ्रा आर्चरने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. जोफ्रा आर्चर व्यतिरिक्त आदिल रशीदने एक विकेट घेतली.

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).