आज करके आया क्या? | Hardik Pandya Troll | (Photo Credit-Twitter)

भारत आणि न्युझीलंड (India Vs New Zealand) दरम्यान सुरु असलेल्या T20 मालिकेत हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) दमदार कमबॅक केले. एकीकडे त्याच्या धमाकेदार कामगिरीचे कौतुक होत असताना दुसरीकडे त्याला ट्रोल करण्याची एकही संधी लोक सोडत नाहीयेत. भारत आणि न्युझीलंडविरुद्ध रंगलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात हार्दिकला ट्रोल करण्यात आले. त्याला ट्रोल करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियात भलताच व्हायरल होत आहे. या फोटोत एका मुलीने हातात बॅनर पकडला आहे. त्यावर लिहिले आहे की, "पंड्या, आज करके आया क्या?" (हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरोधात जोधपूर येथे गुन्हा दाखल)

करण जोहरच्या कॉफी विथ करण टॉक शो मध्ये महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणं हार्दिक पंड्याला चांगलच महागात पडलं आहे. यावेळेस पंड्यासोबत के एल राहुल देखील असल्याने सोशल मीडियात दोघांवर चांगलीच टीका झाली. इतकंच नाहीतर त्यांच्यावर तीन एकदिवसीय सामन्यात खेळण्याची बंदीही घालण्यात आली होती. (न्युझीलंड संघावर भारतीय क्रिकेट संघाची 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 अशी बरोबरी)

काही दिवसांपूर्वी दोघांवरील निलंबन रद्द करण्यात आले आणि क्रिकेट संघात दोघांचेही पुर्नरागमन झाले. न्युझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात परतल्यानंतर पंड्याला दोन विकेट्स घेण्यात यश आले. गेल्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यात हार्दिक पंड्याने 65 धावा केल्या असून 6 विकेट्स घेतल्या आहेत.