Womens Team India (Photo Credit - Twitter)

हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ Indian Women's Cricket Video) जवळपास 2 महिन्यांनंतर पहिली आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका (T20 Series) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेशिवाय टीम इंडियाला मायदेशात इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हा सामना तुम्ही स्पोर्ट्स 18 व्यतिरिक्त, तुम्ही डीडी स्पोर्ट्स, डीडी भारती आणि डीडी फ्री डिशवर टीव्हीवर भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-20 सामना पाहू शकता. तुम्ही या सामन्यांचा ऑनलाइनही आनंद घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला Jio Cinema वर लॉग इन करावे लागेल. (हे देखील वाचा: Rishabh Pant च्या पुनरागमनाची जोरदार तयारी! लवकरच होऊ शकतो Team India मध्ये एन्ट्री (Watch Video)

हेड टू हेड रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या नऊ सामन्यांपैकी भारताने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. शेवटचा विजय पाच वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव झाला होता. इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत झालेल्या एकूण 27 सामन्यांपैकी भारताने केवळ सात सामने जिंकले आहेत.  भारतीय महिला संघाने मार्च 2021 मध्ये लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर शेवटचा टी-20 सामना जिंकला होता. तेव्हापासून भारताने घरच्या मैदानावर चार सामने गमावले असून एक बरोबरीत सुटला आहे. घरच्या 50 टी-20 सामन्यांपैकी भारताने फक्त 19 जिंकले आहेत, 30 गमावले आहेत आणि एक बरोबरीत आहे. गेल्या टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. पुढील स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये होणार असून त्यासाठी तयारी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.

इंग्लंड : लॉरेन बेल, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेटन, माहिका गौर, डॅनिएल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, हीदर नाइट, नॅट स्क्वायर ब्रंट, डॅनियल व्याट.