क्रिकेट विश्वात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) शिरकाव झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचे (Pakistan Cricket Team) तब्ब्ल 10 खेळाडू या व्हायरसने संक्रमित झाले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचा इंग्लंड दौरा (Pakistan Tour of England) नियोजित वेळेनुसार होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. 28 जून रोजी पाकिस्तान टीम इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. कोरोना व्हायरस चाचणीच्या पहिल्या फेरीपासून एकूण दहा खेळाडू सकारात्मक आढळले. या उन्हाळ्यात इंग्लंड दौरा होणार असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) बोर्डाचे मुख्य कार्यकारी वसीम खान (Wasim Khan) यांचे ठाम मत आहे. पीसीबीने कराची, लाहोर आणि पेशावर येथे सोमवारी एकूण 35 चाचण्या घेतल्या. सोमवारी मध्ये हैदर अली, हॅरिस रऊफ आणि शादाब खान कोविड-19 संक्रमित आढळले, तर दुसर्या दिवशी, मंगळवारी मोहम्मद हाफिज आणि वहाब रियाज यांच्यासह इतर सात क्रिकेटपटूंना कोरोना झाल्याचे आढळून आले. (इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका; मोहम्मद हाफिज, वहाब रियाज यांच्यासह आणखी 7 जणांना कोरोनाची लागण)
इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या एकूण 29 पैकी फक्त 19 खेळाडू लाहोर येथे येत्या 25 जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या टेस्टपूर्वी उपलब्ध आहेत. पण इंग्लंड दौरा वेळापत्रकानुसार होणार असल्याबद्दल वसीम यांना विश्वास आहे. ते म्हणाले, "इंग्लंड दौरा ट्रॅकवर आहे आणि 28 जून रोजी वेळापत्रकानुसार संघ रवाना होईल. सुदैवाने, मोहम्मद रिझवानला वगळता सर्व प्रथम पसंतीच्या रेड बॉल संघ नकारात्मक आहे, याचा अर्थ असा की ते इंग्लंडमध्ये आल्यावर टेस्ट घेतल्यानंतर आणि क्लिअर झाल्यानंतर लगेचच प्रशिक्षण आणि सराव करण्यास प्रारंभ करू शकतात." आदल्या दिवशी इंग्लंड पुरूष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक एशले जाइल्स यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंनी कोरोना व्हायरससाठी सकारात्मक चाचणी घेतल्याच्या बातमीवर चिंता व्यक्त केली पण इंग्लंडमधील मालिका मालिका होणार यात शंका नाही असा आग्रह धरला.
"ही चिंताजनक बाब आहे, साहजिकच मला त्या खेळाडूंबद्दल आणि त्यांच्या कल्याणाची सर्वात जास्त काळजी आहे जे सकारात्मक आहे." जाईल्स म्हणाले. "याक्षणी, मला वाटत नाही की मालिका संशयास्पद आहे. या क्षणी जास्त चिंता करण्याची गरज नाही कारण कसोटी मालिका सुरू होण्यापासून आम्ही बरेच दूर आहोत. उर्वरित गटाकडून आणखी काही चाचण्यांचे निकाल पुढे येत आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे काय आहे ते आम्हाला पाहायला मिळेल, परंतु अजूनही आम्हाला आशा आहे की लवकरच पाकिस्तान संघ बर्यापैकी लवकरच देशात दाखल होईल."