ENG vs AUS 3rd ODI 2024: तिसऱ्या वनडेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा (ENG Beat AUS 3rd ODI 2024) पराभव केला आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर करून ऑस्ट्रेलियाचा 46 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची सलग 14 एकदिवसीय सामन्यांची विजयी मालिका रोखली. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 304 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात इंग्लंडने 37.4 षटकात 4 विकेट गमावत 254 धावा केल्या. यानंतर पुढे खेळ होऊ शकला नाही. अशा प्रकारे डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले.
हॅरी ब्रूक आणि विल जॅकची झंझावाती खेळी
इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रूकने नाबाद शतक झळकावले. हॅरी ब्रूक 94 चेंडूत 110 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार मारले. विल जॅकने 82 चेंडूत 84 धावांचे योगदान दिले. या खेळाडूने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचवेळी, लियाम लिव्हिंगस्टोनने 20 चेंडूत 33 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. (हे देखील वाचा: England vs Australia 2nd ODI Match, Video Highlights: ऑस्टेलियाची इंग्लंडवर शानदार विजयासह मालिकेत आघाडी; पाहा मॅचची व्हिडिओ हाईलाईट्स)
14-match winning streak over ❌
Australia have been beaten in a men’s ODI for the first time in 348 days! pic.twitter.com/CsTwZ4W46v
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 24, 2024
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची होती ही अवस्था
मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. मिचेल स्टार्कने 8 षटकात 63 धावा देत 2 बळी घेतले. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनने 6 षटकांत 45 धावा देत 2 फलंदाजांना आपला बळी बनवले. पण याशिवाय जोश हेझलवूड, शॉन ॲबॉट, ॲरॉन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू शॉर्ट यांना यश मिळाले नाही.
ॲलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी चमकले
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 304 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने 65 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. याशिवाय स्टीव्ह स्मिथने 82 चेंडूत 60 धावांचे योगदान दिले. तर ॲरॉन हार्डीने 26 चेंडूत 44 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल 25 चेंडूत 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.