IND vs ENG 1st Likely Playing XI: ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या उद्देशाने इंग्लंड (England) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला (India) टक्कर देण्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज असेल. 2012 पासून घरातील कसोटी मालिका न गमावलेल्या टीम इंडियापुढे (Team India) जो रूटच्या (Joe Root) इंग्लंड संघाला विजयासाठी नक्कीच संघर्ष करावा लागणार आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीवरील कसोटी मालिकेतील विजय नोंदविणारा इंग्लंड दौरा करणारा शेवटचा संघ होता, पण यावेळेस त्यांच्यासाठी आव्हान बरेचच कठीण असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस लॉर्डस् मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये सामन्यात स्थान मिळवण्यासाठी तीन लायन्सला भारताविरुद्ध 3-0 असा विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे चेन्नईच्या (Chennai Team) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यात पराभव टाळण्यावर इंग्लिश टीम भर देईल. आणि यासाठी इंग्लंडला प्रभावी प्लेइंग इलेव्हन निवडण्याची गरज आहे. (India Likely Playing XI for 1st Test vs England: रिषभ पंत-रिद्धिमान साहा, अक्षर पटेल-वॉशिंग्टन सुंदर? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियापुढे Playing XI निवडीची डोकेदुखी)
झॅक क्रॉली आणि डोमिनिक सिब्ली श्रीलंकाविरुद्ध पराभव सुरुवात करण्यात अपयशी ठरले असले तरी सलामी जोडी म्हणून दोघे आपले स्थान कायम ठेवतील. मात्र, रॉरी बर्न्स संघात परतला असल्याने क्रॉली तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल तर सिब्ली आणि बर्न्स इंग्लंडकडून सलामीला येतील. क्रॉली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता असल्याने कर्णधार जो रुट चौथ्या क्रमांकावर मैदानावर उतरेल. उल्लेखनीय म्हणजे, चेन्नईतील पहिला कसोटी सामना रूटच्या टेस्ट करिअरमधील 100वा सामना असेल. शिवाय, रूटचा सध्याचा फॉर्म संघासाठी ‘ट्रम्प कार्ड’ सिद्ध होऊ शकतो. श्रीलंका दौऱ्यावर विश्रांती मिळालेला बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक करेल आणि पाचव्या स्थानाची जबाबदारी सांभाळेल आणि 2016-17 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छित असेल. जोस बटलर संघाचा विकेटकीपर असेल. त्याच्या आक्रमक फलंदाजी भारतीय फिरकीपटूंना दबावाखाली आणू शकतो, त्यामुळे बटलर इंग्लंडसाठी विजय मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो.
इंग्लंडकडे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यासह घातक वेगवान गोलंदाज आहेत, पण पहिल्या सामन्यात फक्त दोन वेगवान गोलंदाजांना स्थान मिळू शकते. त्यामुळे, आर्चर आणि अँडरसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताना दिसत आहे. अँडरसनचा भारत आणि विराट कोहलीविरुद्ध आकडेवारी पाहता त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणे निश्चित असून पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यात ‘ट्रम्प कार्ड’ सिद्ध होऊ शकतो. उर्वरित दोन स्लॉट डोम बेस आणि जॅक लीच भरतील.या दोन फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध अपवादात्मक कामगिरी बजावली होती, पण भारतीय फलंदाजांचे डिफेंसिंव्ह फलंदाजीविरुद्ध त्यांना आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पहा इंग्लंडचा भारताविरुद्ध संभाव्य इलेव्हन: रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ली, झॅक क्रॉली, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), मोईन अली, डोमिनिक बेस, जॅक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन.